महावितरणची कर्तव्यदक्षता आटपाडीतील ‘त्या’ शेतकऱ्यास मिळाली रीतसर वीज जोडणी

0

आटपाडी,संकेत टाइम्स : राज्यभर ‌चर्चा झालेल्या आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटलांचीवाडी गावच्या शेतकऱ्यास अखेर न्याय मिळाला आहे.महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तात्काळ विजेची जोडणी करून देत शेतकरी वेताळ चव्हाण यांच्या भावनेची तात्काळ दखल घेत कर्तव्यदक्षता दाखवली आहे.वेताळ चव्हाण या शेतकऱ्याने वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत चक्क इंग्रजी भाषेत संवाद साधत आपली भावना व्यक्त केली होती.

वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकरी चव्हाण यांनी चक्क इंग्रजीमध्ये संभाषण साधत वीज चोरी पकडण्यासाठी आला आहात तर मला तात्काळ वीज जोडणी द्या, त्यासाठी मी तयार असल्याचे इंग्रजीतून संभाषण केल्याचा व्हिडीओ प्रसारमाध्यमासह सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

आटपाडी तालुक्यामध्ये शेतीच्या विद्युत पंपासाठी वीज चोरी होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे पथकांच्या निदर्शनास आले आहे.अशा विजचोरी पकडण्यासाठी पथकाकडून तपासणी सुरू आहे.दरम्यान चोरी पकडण्यासाठी यमाजी पाटलांची वाडी याठिकाणी पथक गेले होते. यावेळी सहाय्यक अभियंता सुनील पवार यांना जेष्ठ शेतकरी वेताळ चव्हाण यांनी विद्युत पंपासाठी वीज चोरी करत असल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांचे सर्व साहित्य जप्त करत असल्याचे सांगितले.
यावेळी शेतकरी चव्हाण यांनी अधिकाऱ्यांशी चक्क इंग्रजी मधून बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी तुम्ही कायदेशीर कारवाई करा मला काही अडचण नाही. माझे वकील तुम्हाला त्याचे उत्तर देतील असे सांगतच मला जागेवरच वीज कनेक्शन देण्याची मागणी केली.

Rate Card

 

त्यांचे हे इंग्रजीतील संभाषण सोशल मीडियीवर प्रंचड व्हायरल झाले होते.त्यांची चर्चा राज्यभर झाल्यानंतर गुरुवारी आटपाडी महावितरण उपविभागाचे मुख्य अभियंता संजय बालटे, सहाय्यक अभियंता सुनील पवार यांनी य.पा.वाडीचे शेतकरी वेताळ चव्हाण यांची भेट घेतली. त्यांना तात्काळ कृषी पंपाचे वीज कनेक्शन जोडून देत त्याच्या मागणीला न्याय दिला.त्यांच्या भावनाची दखल महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.