विचाराने श्रीमंत व्हा !

0
प्रत्येकाच्या जीवनात विचाराला खुप मोठे महत्त्व आहे.आपल्या विचारावरूनच आपली पारख केली जाते .की आपण कसे आहोत . त्यासाठी जीवनात चांगले विचार आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली आहे.आपण पैसे कमवून श्रीमंत होऊ शकतो.परंतू विचाराने मोठे नाही . आपल्याला मोठं व्हायचे असेल तर आधी विचाराने श्रीमंत झाले पाहिजे.आज सभोवताली केवळ पैसा कमविणे हेच जीवनाचे उद्दिष्ट झाले आहे.परंतू याच्याही पुढे जाऊन आपल्याला वेगळा विचार करावा लागणार आहे.केवळ पैसा म्हणजे सर्वस्व नाही.पैशाने सुख, सुविधा मिळतील.पण विचार नाही.आपल्याकडे ज्याच्याकडे जास्त पैसा तो श्रीमंत माणुस मानले जाते.

 

खरं म्हणजे पैसा एवढीच एकमेव संपत्ती आहे असं मानणे चुकीचे आहे.जो मिणुस विचाराने श्रीमंत आहे .त्याला श्रीमंत समजले गेले पाहिजे.श्रीम़ंतीची व्याख्या बदलण्याची गरज आहे.आज विचारांनी श्रीमंत असलेला माणुस मात्र दुर्लक्षित झाला आहे.आज एखादा निर्णय घेत असताना त्याच्याकडे किती ज्ञान आहे.याकडे पाहीले जात नाही.परंतू एखादा श्रीमंत असलेला व्यक्तीच्या शब्दाला किंमत दिली जाते.आज पैशाने लोक श्रीमंत झाली .परंतू विचाराने गरीब झाली.आजच्या काळात विचाराला किंमत देण्याची वेळ आली आहे.ज्याच्याकडे चांगले विचार तो खरा श्रीमंत माणूस होय.

 

 

आज जगात सर्वात सुंदर गोष्ट कोणती असेल तर आपले विचार त्यासाठी जीवनात चांगले विचारांची गरज आहे.आज विचाराने जी माणसे श्रीमंत आहेत ते आयुष्यात सुखी आहेत.आपल्या जीवनात चांगले विचारच बदल घडवुन आणत असतात.आजच्या काळात विचाराला खुप महत्व प्राप्त झाले आहे.लहानपणी शाळेत असताना फळ्यावर चांगले विचार लिहलले असत.आजदेखील शाळांमध्ये सुविचार लिहण्याची  परंपरा चालु आहे.दररोजच्या वर्तमानपत्रात देखील चांगले सुविचार छापुन येत असतात.ही चांगली बाब आहे.असे सुविचार आपल्या जीवनात आत्मसात करून आपले विचार वाढवण्याची आवश्यकता आहे. जीवनात चांगले विचार आत्मसात करा व विचाराने श्रीमंत व्हा.चांगले विचार बाळगा.सतत चांगला विचार करा.चा़गले विचारच आपल्या वाईट विचारांना नष्ट करत असतात.चांगले विचार आपलं आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही.त्यासाठी विचाराने श्रीमंत व्हा.
Rate Card
संतोष दत्तू शिंदे
मु.पो.काष्टी,ता.श्रीगोंदा, जिल्हा,अहमदनगर
महाराष्ट्र
मो.७९७२७४५०२५

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.