जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात मान्सूनने यावर्षीही पाठ फिरविली आहे.गेल्या चार दिवसापासून एकादी दुसरी रिमझिम सरी वगळता आकाशात ढगाळ वातावरण पसरले आहे.
तालुक्यात खरीपाच्या बऱ्यापैंकी पेरण्या झाल्या आहेत.अद्यापही सुरू आहेत. मात्र एकाद्या,दुसऱ्या सरीशिवाय अपेक्षित पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी या भागात दाखल झाल्याने मोठ्या संख्येने शेती केली जात आहे. मात्र ऐन हंगामात पावसाने पाट फिरविल्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे टाकले आहे.