करजगी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
करजगी : करजगी (ता जत) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन वेदमूर्ती बसय्या हिरेमठ, सरपंच चन्नाप्पा पट्टणशेट्टी,उपसरपंच देवेंद्रय्या मठपती, बीट हवालदार श्रीशैल वळसंगकर,शिवनंद अक्कलकोट,यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य,सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन,व्हाईस चेअरमन,संचालक,पोलीस पाटील, कोतवाल,ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील सर्व शिवप्रेमी खास करून उपस्थित होते.