जत,संकेत टाइम्स : जत तालुका राज्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत मागास असल्याने तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खालील प्रश्नांची तातडीने सोडवणूक करून पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही जत तालुक्यातील नागरिक आपणाकडे घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करीत असून आपण योग्य ती कार्यवाही करावी.
जत तालुका राज्यातील सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला मोठा तालुका आहे त्यामूळे तालुक्यातील जनतेचे आणि प्रशासनाच्या कामकाजाच्या सोयीसाठी तातडीने विभाजन करणे गरजेचे आहे,विभाजन झाल्यास प्रशासनावरील कामाचा प्रचंड तणाव कमी होईल
जत तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने त्याचा तालुक्याच्या विकास कामावर परिणाम होत आहे तसेच कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यंच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने त्यांच्या शारारिक मानसिक परिणाम होत आहे.
सरकारी दवाखान्याच्या इमारती आहेत पण उपचार करण्यासाठी डॉक्टर्स नाहीत तसेच आरोग्य कर्मचारी पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
तालुक्यामध्ये कोणताही मोठा उद्योग व्यवसाय नसल्याने तालुक्यातील शेतकरी,युवा बेरोजगार तरुणांनी पशुपालक व्यवसाय केला आहे पण पशू पक्षी यांच्या उपचार करण्यासाठी डॉक्टर्स नाहीत
जत तालुक्यातील कोणत्याही गावाने प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची मागणी केली नसताना आणि प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची पाणीपट्टी नागरिकांना परवडणारी नाही त्यामूळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेची जबरदस्ती गावांवर लादू नका.
जत तालुक्यातील पूर्व भागातील गावासाठी म्हैशाल योजनेच्या सुधारित कामाचे अर्धवट टेंडर प्रक्रिया राबवली असून राहिलेली टेंडर प्रक्रिया लवकरच राबवावी.म्हैसाळ योजनेचे कार्यक्षेत्र जत तालुका असताना विभागीय कार्यालय मात्र सांगली येथे असून कुणीही अधिकारी कर्मचारी सांगलीत असतात त्यामुळे योजनेच्या कामकाज आणि शेतकरी यांच्या सोयीसाठी सांगली येथील विभागीय कार्यालय जत येथे स्थलांतरित करावे.
राज्य परिवहन महामंडळ :-
राज्य परिवहन महामंडळाच्या जत विभागात एकही बस सुस्थितीत नाही तसेच एकही बस वेळेवर सुटत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून वेळेवर बस सेवा उपलब्ध करावी.तसेच जत शहरात सुसज्ज असे बसस्थानक उभे करून बस स्थानक परिसरात लघु उद्योजकांसाठी बांधा वापरा हस्तांतरण करा या धर्तीवर गाळे उपलब्ध करून द्यावे.
महसूल विभाग :
जत तालुक्यामध्ये १२५ गावे वाड्या वस्त्या असून क्षेत्रफळ मोठा असलेला तालुका असून संखं येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करावे. जत शहरात स्वतंत्र वाहतूक विभाग सुरू करावा जेणेकरून पोलीस प्रशासनावरील ताण कमी होईल.
संख अप्पर कार्यालयात अधिकारी कर्मचारी पद निर्मिती करावी सांगली अप्पर तहसीलदार कार्यालयात ३१ गावासाठी ७ अधिकारी कर्मचारी आणि संख अप्पर तहसीलदार कार्यालयाकडे ६७ गावे असताना फक्त २ पदे आहेत हे अन्यायकारक असून तातडीने पद निर्मिती करून पदे भरावीत.
रस्ता दुरुस्ती :-
जत शहरातील सांगली जिल्ह्याला जोडणारा मुख्य रस्ता छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यान हा रस्ता दोन वर्षाहून अधिक काळ नादुरुस्त आहे, खड्डेमय झाला असून या रस्त्यावर सर्वच प्रशासकीय कार्यालय, न्यायालय,शाळा, महाविद्यालय,याच प्रमुख रस्तावर असून नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असून हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा.
पी एम किसान योजना :-
पी एम किसान योजनेच्या अडचणीबाबत महसूल विभाग कृषी विभागाकडे कृषी विभाग महसूल विभागाकडे टोलवा टोलवी करीत असून यामुळे शेतकरी बांधवांची गैरसोय होत आहे त्याबाबत योग्य आदेश व्हावेत. हे सर्व प्रश्न तातडीने सोडविणे गरजेचं आहे त्यामुळे जत तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदत होईल म्हणून आपण आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनास स्वराज्य संघटना, आर पी आय,संभाजी ब्रिगेड,वंचित बहुजन आघाडी या संघटना, डीपीआयचे अविनाश वाघमारे,राष्ट्रवादीचे उत्तम चव्हाण, हेमंत चौगुले, वायफळ सरपंच रमेश साबळे गुरुजी, उमराणीचे सरपंच विजय नामद, जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, युवराज हाके,उपसरपंच सुनील शेजाले, महादेव सोलंकर, उत्तम म्हारणुर अण्णासो टेगले, रवी कित्तुरे, सुरेश हाके समाधान वाघमोडे,भूपेंद्र कांबळे, भरमांना खांडेकर, स्वराज्य संघटनेचे तानाजी भोसले लियाकत बारुदवले ,निलेश मंगलेकर, रासपचे अखिल नगराजी लिंबाजी माळी, अविनाश पाथारुट,तानाजी भोसले, प्रमोद ऐवळे,दशरथ बल्लारी, बंटी नदाफ ,बाजी केंगार,पिंटू माने, ॲड नाना गडदे,सुरेश घागरे,नितीन तोरवे, जेटलींग कोरे, नगरसेवक गौतम एवले,प्रशांत पथारुट,सचिन पोतदार आदी उपस्थित होते.
जत येथे विविध मागण्यासाठी विक्रम ढोणे यांनी घंटानाद आंदोलन केले.