फॅबटेक मल्टीस्टेट महाराष्ट्रात गाजेल | – श्रीकांत मोरे | सोलापूर येथे 22 व्या शाखेचा शुभारंभ

0
सोलापूर : भाऊसाहेब रुपनर व त्यांचा कुंटुब सांगोला सारख्या कायम दुष्काळी तालुक्यात जन्म घेऊन संघर्षातून आणि चिकाटीतून फॅबटेक उद्योग समूह निर्माण केली.त्याचाच एक भाग म्हणून पारदर्शकता,विश्वसनीयता आणि सुरक्षिततेच्या माध्यमातून फॅबटेक मल्टीस्टेटचा कारभार सुरु आहे.या त्रिसुत्रीच्या जोरावर भविष्यात फॅबटेक मल्टीस्टेट महाराष्ट्रात गाजेल असे प्रतिपादन मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक तथा सहकारतज्ञ श्रीकांत मोरे व त्यांचे सुविद्य पत्नी मनोरमा सखी मंचचे अध्यक्षा सौ.शोभाताई मोरे यांनी केले.ते सोलापूर येथे झालेल्या फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर 22 व्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके,जेष्ठ नेते सिद्राम वाकसे महापौर सौ.अरुणाताई वाकसे,नगरसेवक मधुकर आठवले,जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष धर्मराज पुजारी,सामाजिक कार्यकर्ता शाम धुरी,स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कुलकर्णी,सुवर्णरत्न मल्टीस्टेटचे चेअरमन महादेव बिराजदार,धनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन आकाश पुजारी,मनोरमा बँकेचे सरव्यवस्थापक कमलाकर पुजारी,संतोष वाकसे,ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक काशिनाथ भतगुणकी उपस्थित होते.
महापौर अरुणाताई वाकसे म्हणाल्या की,सर्व जनता जनार्दनाचे आशीर्वाद भाऊसाहेब रुपनर याना मिळाले पाहिजेत.सोलापूर जिल्ह्यात एक चांगली आर्थिक संस्था त्यांनी निर्माण केली आहे.खुप मोठ्या प्रमाणावर त्यांनी संस्था उभी केली आहे.संस्थेचे जाळे जिल्हाभरात विनलं जात आहे.आदर्श कारभार आणि पारदर्शकच्या जोरावर भविष्यात फॅबटेकचे नांव महाराष्ट्रात गाजेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके म्हणाले,शेतकरी कुंटुबातून पुढे येवून पारदर्शक कारभार उभा केला आहे.खातेदारांच्या विश्वास त्यांनी संपादन केला असून यापुढेही असे चांगला कार्य करुन हा विश्वास त्यांनी अबाधित ठेवावा.ग्रामीण भागातून पुढे येत काम केले.फॅबटेक मल्टीस्टेटच्या माध्यमातून आज हजारो तरुणांना रोजगार दिला.त्यामुळे फॅबटेक मल्टीस्टेट नावाला साजेसं कार्य उभा करील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

व्हा.चेअरमन अनिल इंगवले म्हणाले, फॅबटेक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली फॅबटेक मल्टीस्टेटने यशस्वीपणे 6 वर्षे पुर्ण केलेली आहेत.फॅबटेक मल्टीस्टेट च्या सोलापूर जिल्ह्यात 10 शाखा असून सोलापूर ही 11 वी शाखा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पेठवडगांव,हातकणंगले सांगली जिल्ह्यात खानापूर,तासगांव,सांगली तसेच पुणे येथे व कर्नाटक राज्यात धुळखेड,इंडी,विजयपूर येथे नविन शाखा विस्तार लवकरच करणार आहोत. मनोरमा सखी मंच चे अध्यक्षा सौ.शोभाताई मोरे यांनी भाऊसाहेब रुपनर यांनी आपल्या कार्याचा वटवृक्ष निर्माण केला आहे.एक छोटंस रोपटं आज मोठ होत आहे याचा आनंद वाटतो.या रोपट्याला त्यांनी जनतेच्या विश्वासाचं खतपाणी घातले असून त्याचं वटवृक्षात रुपांतर व्हावं.भविष्यात फॅबटेक मल्टीस्टेटच्या पन्नास शाखा स्थापन व्हाव्यात अशा शब्दात त्यांनी फॅबटेक मल्टीस्टेटला शुभेच्छा दिल्या.
Rate Card
यावेळी नगरसेवक मधुकर आठवले,धर्मराज पुजारी,शाम धुरी,संतोष वाकसे यांनी मनोगते व्यक्त केली.प्रास्ताविक संस्थेचे संचालक किरण पुजारी व मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक बंदरे यांनी केली.सुत्रसंचालन प्रख्यात वक्ते काशिनाथ भतगुणकी यांनी केले.
सोलापूर : फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि,सांगोलाच्या सोलापूर येथील 22 व्या शाखेचे उद्घाटन मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे,सौ.शोभाताई मोरे यांच्याहस्ते झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.