सांगली : जमिनीच्या मोजणीची तसेच वेगवेगळ्या सर्वेक्षणासाठी करण्यात येणाऱ्या मोजणीसाठी ईटीएस मशिन महत्वपूर्ण कामगिरी बजावेल. त्यामुळे मोजणीच्या कामात पारदर्शकता व गतीमानता येईल. तसेच भूमि अभिलेख विभाग अधिक सक्षमपणे काम करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयास 6 ईटीएस मशिन प्रदान करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, तहसिलदार (महसूल) शरद घाडगे, प्रभारी जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख रोहिणी सागरे, उपअधिक्षक भूमि अभिलेख ज्योती पाटील, वर्षा सुर्यवंशी, अशोक चव्हाण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मोजणीच्या कामामध्ये गतीमानता यावी, जिल्ह्यातील जनतेची प्रलंबित मोजणीची कामे तातडीने व्हावीत यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या सन 2020-21 मधील नाविण्यपूर्ण योजनेतून तालुकास्तरीय कार्यालयांना 6 ईटीएस मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मशिनव्दारे प्रलंबित भूसंपादन मोजणी प्रकरणांचा तातडीने निपटारा करता येणे शक्य आहे.
इस्लामपूर, तासगाव, पलूस, खानापूर, विटा व वाळवा कार्यालयांसाठी प्रत्येकी एक मशिन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मशिन्स अद्ययावत तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेल्या आहेत. या मशिनचा वापर नियमित भूमापन, भूसंपादन प्रकरणे, गौण खनिज मोजणी प्रकरणे, गावठाणातील मिळकतींची मोजणी व इतर मोजणी प्रकरणे अचुकतेने व वेळेत पूर्ण करण्याकामी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास 18 जून पर्यंत मुदतवाढ
– सहायक आयुक्त संभाजी पोवार
सांगली : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतिवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले असून अर्ज सादर करण्यास दिनांक 18 जून 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संभाजी पोवार यांनी केले आहे.
अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनूसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qx World University Ranking) 300 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. परिपुर्ण अर्ज swfs.applications.2122@gmail.