स्टॅम्प पेपर भारतात कधी सुरू झाला?एकाद्या स्टॅम्प पेपरची नेमकी मुदत किती असते..!

0
34
सर्वत्र महत्वाच्या कामासाठी वापरला जाणारा स्टॅम्प पेपर हा एक सरकारी दस्तऐवज आहे.भारतात, मुद्रांक शुल्क कायदा 1899 च्या आधारावर नॉन – ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर आणि न्यायालयीन शुल्क कायदा 1870 च्या आधारावर ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर भूगतान दिले जाते.विविध व्यवहारात शासकीय महत्वाचा दस्तावेज आहे,त्याचबरोबर शासनाला यातून मोठ्या प्रमाणात टँक्सही उपलब्ध होत आहे.
सामान्यत: आपण वापरतो तो कागदी मुद्रांक कागद हा नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर असतो. ज्याचा उपयोग विविध व्यवहार वैध करण्यासाठी होतात.सर्वात महत्वाचे म्हणजे स्टॅम्प पेपरच्या कालबाह्यतेसाठी निश्चित अशी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही.सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे की, भारतीय मुद्रांक कायदा 1899 लक्षात घेऊन त्याची मुदत संपण्यास मर्यादा नाही.
परंतु ज्या व्यक्तीला नजीकच्या भविष्यात स्टॅम्प पेपरची आवश्यकता नसेल आणि स्टॅम्प पेपर घेतला असेल, तो स्टॅम्प पेपर जारी झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत तो त्याच्या जवळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करून परतावा परत मिळवू शकतो.याचा अर्थ स्पष्टपणे असा होता की 6 महिन्यांनंतर परतावा मिळणार नाही. मात्र, याचा अर्थ स्टॅम्प पेपरची वैधता संपेल असे नाही !,त्याचबरोबर स्टँपपेपर परत देण्याचाही पर्याय शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे.
स्टँपवर महसूल स्टॅम्प आधीच छापलेले असतात.भारतीय मुद्रांक कायद्यानुसार,भारतात स्टॅम्प पेपरचे दोन प्रकार केले आहेत.त्यात • ज्युडिशियल स्टॅम्पनॉन(कायदेशीकर कामासाठी वापरला जातो) व • नॉन – ज्युडिशियल स्टॅम्प(मालमत्ते हस्तांतरण,भाडे करार,कर्जे सह अन्य कामासाठी वापरला जातो) असे दोन प्रकारचे स्टँम्प आहेत.
स्टँम्प वापराच्या आधारावर या दोन्ही प्रकारच्या स्टॅम्पचे दोन भागांमध्ये विभाग आहेत,प्रथम ज्युडिशियल स्टॅम्प जो न्यायालयात विविध प्रकारचे शुल्क भरण्यासाठी किंवा इतर कायदेशीर कामांमध्ये वापरण्यात येतो.
तसेच दुसरा नॉन -ज्युडिशियल स्टॅम्प पेपर जो कर्ज काढणे,मालमत्तेचे हस्तांतरण,व्यावसायिक करार, मुखत्यारपत्र, कागदपत्रांची नोंदणी, व्यवहार, विमा पॉलिसी विमा पॉलिसी, मालमत्ता भाडे व्यवहार इत्यादींसाठी वापरला जाऊ शकतो.या स्टँम्पचा सर्वाधिक वापर होत आहे.
जगभरात विविध प्रकारच्या दस्तऐवजांसाठी स्टँम्पचा वापर केला जातो जसे की भाडेपट्टा करार, पावती तसेच कराराची पावती, न्यायालयीन कागदपत्रे म्हणजेच मुद्रांकित करणे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे, सरकारी कर गोळा करण्यासाठी वापरतात.विशेष म्हणजे विविध बँका,पतसंस्था व अन्य ठिकाणीची कर्जे काढण्यासाठीही आता मोठ्या प्रमाणात स्टँम्पचा वापर होत आहे.
कोणत्याही सरकारसाठी निधी उभारण्याचा एक उत्तम मार्ग हा स्टँम्प पेपर मानला जातो.आता स्टँम्प फी म्हणून चलनही वापरात ‌येत आहे. कोणत्याही कागदपत्राला कायदेशीर मान्यता देण्यासाठी स्टँम्प पेपर महत्वाचा बनला आहे.त्याचबरोबर सरकारांला एक विशेष टँक्स स्टँम्प पेपरमधून मिळत आहे.
विवाह नोंदणी, विविध दाखल्यांवर नावात बदल, महापालिकेचे कामकाज, महावितरण, न्यायालयात प्रतिज्ञापत्र, महसूलसंबंधीसाठी वारस नोंदी आदींसह विविध करारनाम्यांसाठी प्रतिज्ञापत्र तयार करण्याकरीता स्टॅम्प पेपरची आवश्यकता असते. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरले जात असल्यामुळे सर्वत्र शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरची खरेदी केली जाते
सूचना: वरील माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे.यामध्ये आम्ही कोणताही दावा करत नाही.काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

हेही वाचा-फक्त हजार पासून पंचवीस हजार रूपये भांडवलात सुरू होणारे व्यवसाय | आजच सुरू करा स्व:चाचा व्यवसाय

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here