गौतमी पुन्हा आरोपाच्या फेऱ्यात,या प्रसिद्ध किर्तनकारांने केली टिका | गौतमीला तीन गाण्यासाठी ३ लाख,मात्र आम्ही ५ हजार मागितले तर होता आरोप

0
तुफान प्रतिसादाने गाजणारे नृत्यांगणा गौतमी पाटील राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.लावणीस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर आक्षेपही घेण्यात आला होता.गौतमीला विरोध करणाऱ्या बातम्या सातत्याने समोर येत असतानाच ता यात कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनीही गौतमीवर टिका केली आहे.

 

हेही वाचा-असही घडू शकते | खेळाडू आणि लहानग्या प्रेक्षकांची जुगलबंदी कँमेरात कैद

इंदुरीकर महाराज गौतमी पाटील यांच्याविषयी बोलताना म्हणालेत,  गौतमीच्या दोन तीन गाण्यासाठी लोक तब्बल तीनतीन लाख मोजतात.इतके पैसे देऊनही कार्यक्रमाचे आयोजन करतात. पंरतू दुसरीकडे आम्ही समाज प्रबोधन करून, टाळ वाजवूनही काही मिळत नाही असं वक्तव्यही इंदुरीकरांनी केलं आहे.  आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे इंदुरीकर महाराज यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

 

हेही वाचा-अबब..कहरचं झाला,आता चुलीवरचा बाबा आला

आम्ही कार्यक्रमासाठी ५ हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असे आरोप होतात.मात्र गौतमी पाटीलने गाणे वाजविले की,३ लाख रुपये दिले जातात.
तिच्या कार्यक्रमात राडा,मारामारी सारखे प्रकार घडतात तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही.साधं संरक्षण देखील दिले जात नाही,असं इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनात थेट उल्लेख करत आरोप केले आहेत.

 

हेही वाचा-नवऱ्यांचा नादचं खुळा,बायकोच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलची लावणी

तरूणांचा तुफान प्रतिसाद म्हटलं कि गौतमी पाटील महाराष्ट्रात प्रसिध्द झाली आहे. सतत वादात सापडत असतानाही गौतमीने वेड लावले आहे. गौतमी पाटीलचा कुठेही कार्यक्रम असला की, आजही तुफान गर्दीचा माहोल तयार होतो. यात तिच्या हातवारे,डान्ससह विविध अदाकारीने स्टेज खेळवून ठेवले जात आहे.प्रसिध्दीच्या शिखरावर असणाऱ्या गौतमीेने अनेकांनी भुरळ पाडली आहे.गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणजे गर्दी आणि राडा हे जणू समीकरण बनले आहे.

 

हेही वाचा-लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील खान्देशी भाषेत काय म्हणाल्या,बघा एका क्लिकवर

ठिकठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी आणि राड्याचा अनुभव पाहता सुरुवातीला गौतमी येण्याचे मेसेज व्हायरल झाल्यानंतर आयोजकांच्या वतीने शेवटच्या क्षणापर्यंत गोपनीयता पाळण्यात येते.मात्र थेट कार्यक्रमस्थळी प्रचंड गर्दी निश्चित होत असल्याने पोलीस बंदोबस्तही ठेवायची वेळ आयोजकावर येते.कार्यक्रमातील नृत्यात गौतमी अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर सातत्याने टीका होत आहे.त्याला अनेक नेते,संघटनानाही विरोध केला आहे. त्यावर गौतमीने माफीही मागितली आहे.यानंतरही गौतमीच्या लोकप्रियतेत प्रत्येक कार्यक्रमात वाढच होत आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांतून तिला नृत्याच्यासाठी बोलवलं जात आहे.

 

हेही वाचा-प्रसिद्ध अभिनेत्रीने 25 व्या वर्षी गळपासाने संपविले जीवन

Rate Card
दरम्यान दुसरीकडे गौतमीने लावणीला बदनाम केल्याचा आरोप ज्येष्ठ लावणी कलावंतांनी केला आहे.गौतमीला त्यांचे काही घेणेदेणे नसल्याने पुन्हा कार्यक्रम आणखीन रंगतदार करण्याकडे तिचा कल दिसून येत असल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत.मात्र आरोपानंतर गौतमीकडूनही अनेक बदल केले आहेत.

हेही वाचा- नवी लावणी स्टार आली | सर्वांना देणार ‘फाईट’

गौतमी पाटील नेमकी आहे कोण?
लावणी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रात लावणी शो पासून सुरूवात केलेली गौतमी पाटील ही सोशल मीडियावर चर्चेचा व सर्वाधिक सर्च केला जात असलेला ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा बनला आहे.आपल्या वेगळ्याच कलेत डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने महाराष्ट्रातील नवतरूणांना वेड लावलं आहे.खानदेशातील असणारी 26 वर्षीय गौतमी ही लावणीस्टार, डान्सर म्हणून तिला ओळखलं जातं आहे.यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल सर्व प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.त्याशिवाय तिच्या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसादामुळे  गौतमीला महाराष्ट्रभर डान्स करण्यासाठी बोलवलं जातं आहे.

हेही वाचा-सबसे कातिल गौतमी पाटील,रिल्स पाहण्यासाठी येेथे क्लिक करा

त्यासाठी तिला मोठं मानधन दिलं जात आहे. दरम्यान गौतमी काही व्हिडीओमधील डान्स स्टेप्समुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. सार्वजनिक कार्यक्रमात डान्स करताना तिने आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्याचे व्हिडिओतून महाराष्ट्र भर पोहचले होते.त्यावर मोठ्या प्रमाणात टिका होऊ लागल्याने गौतमीने जाहीर माफी मागत यापुढे महाराष्ट्राची परपंरा जपूनच कार्यक्रम करणार असल्याचे म्हटले होते.मात्र आता किर्तनकार इंदुरीकर महाराजांनी टिका केल्याने पुन्हा चर्चेला तोंड फुटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.