डॉक्टराला १५ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी व रक्कम न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघावर पोलीसांनी गुन्हा दाखल करत एकास ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी डॉ. कुलदीप आदिनाथ सावंत (रा. शंकर कॉलनी, जत) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी इराणा शिवराम भिसे (वय २७) व अनोळखी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
शेतकऱ्यांना विहिरीसाठी लाच मागितली म्हणून सरपंचाने असे काही केले की,व्हिडिओ तूफान व्हायरल
संशयित आरोपींनी मोबाईल वरून फोन करून १५ लाखाची खंडणी मागितली आहे. सदरची रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील शंकर कॉलनी येथे डॉ सावंत यांचा दवाखाना आहे. संशयित आरोपी इराणा भिसे व त्यांच्या अन्य साथीदारांनी गेल्या तीन दिवसांपासून जेवणाचा सर्व खर्च भागवा अन्यथा जिंवत सोडणार नाही,तुम्हाला बघून घेऊ अशी धमकी दिली होती.
म्हैसाळ योजनेचे पाणी जत पूर्व भागात खळखळू लागले पहा सविस्तर वृत्त
तसेच १५ लाखाची खंडणीची मागणी केली होती. याबाबत डॉ. सावंत यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लवटे करत आहेत.याघटनेने शहरात खळबंळ उडाली आहे.
साताऱ्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी, पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज