जत,संकेत टाइम्स : जत नगरपरिषदेचे ताकतवान भाजपचे नेते,माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक असलेले उमेश सांवत यांनी अखेर स्विकृत्त नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहेत.गेल्या अनेक दिवसापासून सांवत राजीनामा देणार अशी चर्चा होती.एक वर्षासाठी सांवत यांची भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी निवड केली होती. मात्र कोरोना व राजकीय अपरिहार्य कारणांमुळे मला मुदतवाढ मिळाली,अशी भावनिक पोस्ट फेसबुक वर टाकून सांवत यांनी माजी आमदार जगताप व भाजपा विषयी भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,2007 च्या जत ग्रा.पं.च्या निवडणुकीवेळी आम्ही काॅंग्रेसमध्ये होतो. मी सक्षम असताना मला तिकीट नाकारले गेले.त्यावेळी विलासराव जगताप
यांनी संधी दिली.पॅनल मधुन पहिल्यांदा निवडणूक लढविली,एकाकी लढत दिली. पण भाऊबंदकीने आम्हाला पराभूत केलं. त्यांच्या विश्वासघातकी राजकारणाला वैतागून आम्ही तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते
विलासराव जगताप यांच्यासोबत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात सामील झालो.
आम्ही सावंत मुळचे काॅग्रेसप्रेमी असतांनाही जगताप यांनी मोठा विश्वास दाखविला.तालुकाध्यक्ष,नगरसेवक,जिल्हा नियोजन समिती सदस्य,उपनगराध्यक्ष व भाजपामधून माझ्या पत्नीस नगरसेविका व मला स्विकृत नगरसेवक अशा विविध मानाच्या पदांच्या माध्यमातून संधी दिली.अनेक अडीअडचणीत माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहीले .
गेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर अनेक इच्छुक असतांनाही माझी स्विकृत नगरसेवकपदासाठी नियुक्ती केली.या तीन वर्षामध्ये जतकरांच्या सेवेसाठी अखंड संघर्ष केला,
सभागृहामध्ये विरोधकाची भूमिका कणखरपणे निभावली,भारतीय जनपा पार्टी व माजी आमदार जगताप यांच्या विचारांची ज्योत कायम तेवत ठेवली. सत्ताधार्यांच्या भ्रष्टाचारी व अनिर्बंध वृत्तीवर सातत्याने कडाडून विरोध केला.आंदोलने,अगदी उच्च न्यायालयातही लढा दिला.पक्षाने व जगताप यांनी दिलेल्या पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
भारतीय जनता पार्टी व माजी आमदार जगताप यांच्यावर प्रेम करणार्या अनेक युवकांना राजकीय व्यासपीठ मिळावे व एखाद्या नव्या व्यक्तीला संधी मिळावी म्हणून मी जत नगरपरिषदेचा स्विकृत नगरसेवकपदाचा देत आहे.यापुढेही जतच्या जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी व पक्ष,संघटना वाढीसाठी प्रामाणिक काम करत राहीन.