करंजे (ता.खानापूर) येथील मंडल अधिकाऱ्याला सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी 3 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. तर लाच मगितल्याप्रकरणी विटा तलाठ्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी ही कारवाई केली.
मंडलअधिकारी शशिकांत ज्ञानदेव ओमासे (वय ४६) यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर तलाठी विजय शंकर ओमासे (वय ३६) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचे वडील यांनी खरेदी
केलेल्या शेतजमिनीबाबत विट्यातील प्रांत
कार्यालय व सांगली दिवाणी न्यायालय
येथे दावा दाखल होता.न्यायालयात या दाव्याचा
निकाल तक्रारदार यांचे बाजूने लागला आहे.त्या निकालपत्रानुसार सातबाऱ्यावर तक्रारदार यांच्या वडीलांचे नाव नोंद करण्यासाठी मंडल अधिकारी करंजे ओमासे यांनी स्वतः करीता व तलाठी विजय ओमासे यांचेकरीता तक्रारदार यांचेकडे 5 हजार रूपये लाच मागणी केली होती.
याबाबत सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीची ब्युरोच्या प्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता मंडल अधिकारी ओमासे यांनी स्वतः करीता व तलाठी विजय ओमासे
यांचेकरीता 5 हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 3 हजार रूपये
लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मंडल अधिकारी ओमासे यांचेविरूध्द करंजे येथे सापळा लावला.त्यावेळी त्यांना 3 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
पथकाने मंडल अधिकारी ओमासे, तलाठी विजय ओमासे यांना ताब्यात घेण्यात आले.पुढील कारवाई सुरू आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संदीप पाटील,निरीक्षक दत्तात्रय पुजारी यांच्या पथकाने केली. विनायकभिलारे, पोलीस अंमलदार प्रितम चौगुले,अजित पाटील, सलिम मकानदार, उमेश जाधव, पोपट पाटील, हरीभाऊ वाघमोडे,रविंद्र धुमाळ, सिमा माने, चंद्रकांत जाधव,सुदर्शन पाटील, चालक अनिस वंटमुरे हे कर्मचारी पथकात होते.