माजी सैनिकांना मिळणार कला शाखेची पदवी,वाचा सविस्तर..

0

सांगली : माजी सैनिकांना कला शाखेतून BA (HRM) पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून देण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्ड व आंध्र विद्यापीठ यांच्यात करार झाला आहे. हे पदवी प्रमाणपत्र केंद्र व राज्य सरकार तसेच इतर सार्वजनिक उपक्रमाच्या नोकरीसाठी मान्यताप्राप्त आहे. याचा इच्छुक माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

डफळापूरात अवकाळीने नुकसानग्रस्त बागेची पालकमंञ्यांनी केली पाहणी | काय म्हणाले पालकमंत्री(व्हिडिओ)

देशाच्या रक्षणासाठी आपल्या तरूणाईच्या आयुष्याचा मोठा भाग समर्पित करणाऱ्या सैनिकांना नोकरीसाठी शैक्षणिक क्षेत्रात सशक्त बनवणे हा उद्देश आहे. माजी सैनिकास निवृत्तीच्या वेळी प्राप्त झालेले शैक्षणिक प्रमाणपत्र काही संस्था मान्य करत नाहीत. त्यामुळे आंध्र विद्यापीठाशी झालेल्या कराराव्दारे माजी सैनिकास विविध नोकऱ्यांसाठी पात्र होण्यासाठी तसेच सक्षम करण्यासाठी आंध्र विद्यापीठाव्दारे कला शाखेतून BA (HRM) पदवी प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मंडल अधिकाऱ्यासह तलाठी 3 हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

माजी सैनिकांसाठी कला शाखेतून पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्रता व अटी पढीलप्रमाणे आहेत. अर्जदार माजी सैनिक असावा. अर्जदाराचे शिक्षण इयत्ता बारावी किंवा समतुल्य शिक्षण किंवा भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स व्दारा प्राप्त शिक्षणाचे विशेष प्रमाणपत्र. माजी सैनिकांची सेवा पंधरा वर्षापेक्षा कमी नसावी. दिनांक 1 जानेवारी 2010 नंतर निवृत्त झालेला असावा. माजी सैनिक इयत्ता दहावी पास असेल तर अशा उमेदवारांना 5 वर्षाचा अभ्यासक्रम (2 वर्ष 12 वी + 3 वर्ष पदवी) लागू राहील.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज मर्यादा वाढविली ; वाचा सविस्तर

सदर अभ्यासक्रमाची कोर्स फी 12 हजार 500 रूपये असून अर्जदाराने आपले अर्ज फक्त एप्रिल किंवा ऑक्टोबर महिन्यातच संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी www.ksb.gov.in या संकेतस्थळी भेट देऊन circulars / publications पहावे किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास भेट द्यावी.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.