द्राक्षापासून वाईन निर्मितीचा प्रकल्प उभारणार ; रोहित पाटील यांची घोषणा 

0

तासगाव बाजार समिती केवळ द्राक्ष व बेदाण्यापूरती मर्यादित न ठेवता शेळ्या – मेंढ्यांचा बाजार सुरू करून बाजार समितीचे उत्पन्न वाढवणार आहे. तसेच द्राक्षापासून वाईन निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी केली. तर विस्तारित बाजार समितीच्या उभारणीत जितका निधी खर्च झाला नाही त्यापेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो, असा सवाल सुरेश पाटील यांनी करत विरोधकांचे आरोप खोडून काढले.

 

तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी स्व. आर. आर. (आबा) शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ ढवळी (ता. तासगाव) येथून करण्यात आला. यावेळी सुरेश पाटील व रोहित पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुमन पाटील उपस्थित होत्या.

 

यावेळी सुरेश पाटील म्हणाले, स्व. आर. आर. पाटील यांचे स्वप्न असलेल्या बाजार समितीच्या नव्या इमारतीचे काम कुणामुळे बंद पडले याचे उत्तर विरोधकांनी द्यावे. तसेच विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढत जितका निधी खर्च केला आहे त्यापेक्षा ज्यादा रक्कमेचा भ्रष्टाचार कसा काय होऊ शकतो, याचे उत्तर देण्याचे विरोधकांना आव्हान दिले. गेल्या सात ते आठ वर्षात मोठ्या प्रमाणात निधी आणून अपेक्षेपेक्षा जास्त चांगले काम केल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने विरोधक आरोप करत आहेत, असे सांगितले.

Rate Card

 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी ज्येष्ठ नेते शंकर पाटील होते. प्रास्ताविक अमोल पाटील यांनी केले. यावेळी सर्व उमेदवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

काँग्रेस भवनच्या गाळ्यांच्या भाड्याचे काय होते : विशाल पाटील यांचा सवाल

कॉंग्रेसचे युवक नेते अमित उर्फ विशाल पाटील यांनी तासगाव तालुका मध्यवर्ती कॉंग्रेस कार्यालयातील गाळे भाड्याने दिले आहेत. या गाळ्यांच्या भाड्याचे काय होते, असा सवाल उपस्थित केला. तसेच एम. आय. डी. सी साठी आम्ही युद्ध पातळीवर प्रयत्न करत असताना आतल्या बाजूने कोण विरोध करत आहे, हे जनतेने आणि युवकांनी तपासण्याची वेळ आल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.