जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सोमवारी 45 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.तर त्याच्या दुप्पट 88 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने दिलासादायक चित्र आहे.
जत तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव नियंत्रात आहे.मात्र दररोज आढळून येणारे नवे रुग्ण 40-50 च्या दरम्यान आहेत.त्यामुळे संसर्ग कधीही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यात आजपासून सर्व दुकाने सुरू झाल्याने धोका आहे.
तालुक्यातील बाधित संख्या 10,421 नोंद झाली आहे त्यापैंकी 9,414 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 237 रुग्णाचा दुर्देवी मुत्यू झाला आहे.
सध्या तालुक्यात 770 रुग्ण उपचाराखाली आहेत.
जत 4,रेवनाळ 2,तिप्पेहळ्ळी 5,निगडी बु.1,संख 1,वाळेखिंडी 3,प्रतापपूर 1,कासलिंगवाडी 1,कुडणूर 2,डफळापूर 4,मिरवाड 2,सोन्याळ 1, कोळिगिरी 1,व्हसपेठ 3,घोलेश्वर 2,येळवी 1,उमदी 8,उटगी 1