आज लग्न सोहळ्यातील वेगवेगळ्या नव्या पिढीच्या कलाकृत्ती लक्षवेधक परत आहेत.पुण्यातून एक लग्नसोहळ्याची चर्चा सध्या सुरू आहे. नवरदेवाने घोड्यावरुन एन्ट्री करण्याऐवजी वर-वधूने थेट बुलेटवरुन लग्न मंडपात धमाकेदार एन्ट्री केली.त्यांचे स्वागतही तितकेच जोरदार झाले.
पुण्याच्या हवेली तालुक्यातील सांगवी सांडस येथे एका शेतकरी बापाने आपल्या लेकीसाठी कायपण हे ब्रीद खरे करत मुलीच्या लग्नात तिला भेट म्हणून मानपाणासह चक्क एक चारचाकी, एक बुलेट आणि एक दुचाकी भेट देत मुलीप्रती असणारे प्रेम सिध्द केले आहे.या लग्नाची मात्र हवेली तालुक्यात विशेष चर्चा आहे.”