आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ऐश्वर्या जगभरातील अनेक इव्हेंट्सना हजेरी लावत असते. बरेचदा तिच्याबरोबर तिची मुलगी आराध्यादेखील असते. ऐश्वर्या व आराध्या यांच्या सुरक्षेसाठी सावलीप्रमाणे त्यांचा बॉडीगार्ड असतो. या बॉडीगार्डला ऐश्वर्या राय किती पगार देते ते जाणून घेऊयात….
ऐश्वर्या राय बच्चनच्या बॉडीगार्डचे नाव शिवराज आहे. शिवराज सध्या बच्चन कुटुंबासाठी काम करत आहे. तो ऐश्वर्या राय बच्चनला सुरक्षा पुरवतो, शिवराज ऐश्वर्याबरोबर प्रत्येक इव्हेंटला जातो. तो बऱ्याच वर्षापासून कुटुंबासाठी काम करतोय, अमिताभ बच्चन व बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांच्या सुरक्षेसाठी वेगळे बॉडीगार्ड आहेत. सेलिब्रिटी ते पब्लिक फिगर असतात. त्यामुळे मात्र त्यांची सुरक्षा आणि गोपनियता याची त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते. सेलिब्रिटी सामान्य लोकांप्रमाणे फिरू शकत नाहीत. ऐश्वर्याच्या चाहत्यांमध्ये तिची इतकी क्रेझ आहे की तिच्याबरोबर एक सेल्फी मिळावा यासाठी गदीं होत असते.
त्यामुळे ऐश्वर्या जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा तिच्याबरोबर बॉडीगार्ड असतात. शिवराज हा बऱ्याच काळापासून ऐश्वर्या साठी काम करत आहे. शिवराजचा एका वर्षाचा पगार एक कोटींहून जास्त असल्याचं वृत्त समोर आलं आहे. बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या सुरक्षेसाठी खूप पैसे खर्च करतात, ऐश्वर्या प्रमाणेच अनुष्का शर्माबरोबर कायम तिचा बॉडीगार्ड असतो. अनुष्का शर्मा व विराट कोहली यांच्या बॉडीगार्डचं नाव प्रकाश सिंह उर्फ सोनू आहे. सोनूला अनुष्का व विराटच्या संरक्षणासाठी १.२ कोटी रुपये वार्षिक पगार दिला जातो. सेलिब्रिटींच्या बॉडीगाईचा पगार अनके कंपन्यांच्या सीईओंपेक्षा जास्त असतो.