जतेत खळबळ | बनावट कागदपत्रे करून घर हडपण्याचा प्रयत्न

0
जत तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली असून घराची बनावट कागदपत्र तयार करून घर हडप करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी व खोट्या कागदपत्राच्या आधारे विद्युत कनेक्शन घेतल्याचा आरोप करत सुरेश साऊबा साळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जत शहरातील शांताबाई साऊबा साळे, दऱ्याबा साऊबा साळे, प्रकाश साऊबा साळे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा जत पोलीसात दाखल झाला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,जत नगरपालिका हद्दीत सुरेश साळे यांची मालमत्ता आहे.

 

ही मालमत्तेचा बनावट उतारा करून त्यावर मुख्याधिकारी यांचा बनावट शिक्का व सही करून घेत शांताबाई साळे, दर्याप्पा साळे यांनी नातेवाईक सुरेश साळे यांचे घर हडपण्याचा प्रयत्न केला होता.हा प्रकार सुरेश साळे यांच्या लक्षात येताच त्यांनी नगरपरिषदेकडे चौकशी केली असता बनावट कागदपत्राचा वापर करून विद्युत कनेक्शन घेतले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विद्युत कनेक्शनच्या आधारे मालकी व कब्जा करण्याचा प्रयत्न तिघे करत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले होते.

 

Rate Card
ही सर्व कागदपत्र साळे यांनी जमा करून महावितरण मध्ये वापरलेले कागदपत्र बनावट असल्याचे सांगत जत पोलिसात फसवणूक, बनावट दस्तऐवज, कागदपत्राची अफरातफर केल्याप्रकरणी फिर्याद दिली.पोलीसांनी संशयित तिघांवर गुन्हा दाखल केला.या घटनेचा अधिक तपास पोलीसाकडून सुरू आहे.

 

जत शहरासह तालुक्यात लँन्ड माफियाकडून कागदपत्रात छेडछाड करून मालमत्ता हडप करण्याचे अनेक प्रकार सातत्याने सुरू आहे.यावर निर्बध आणण्यासाठी संबधित यंत्रणांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.