महाराष्ट्रात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणूकीत ९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरविले होते.कर्नाटकच्या राजकारणात प्रवेश आम्ही उमेदवार दिल्याची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार जाहीर केली होती. राष्ट्रवादीच्या कर्नाटकातील कामगिरीचं मूल्यमापन करताना ही यादी महत्वाची ठरणार आहे. बेळगाव, विजापूर, विजयनगर, कोप्पल, कोडोगो, मैसूर या जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार दिले होते.निपाणीत मोठी सभा घेत यावेळी कर्नाटकच्याराजकारणात प्रवेश मिळविणार अशी घोषणा केली होती.
१. निपाणी (बेळगाव)-उत्तमराव पाटील,२. जेवर हिप्पारगी (विजापूर)- मन्सूर साहेब बिलाही,३. बसवन बागेवाडी (विजापूर) – जमीर अहमद इनामदार,४. नागथन (विजापूर)- कुलप्पा चव्हाण,५. येलबर्गा (कोप्पल) -हरी आर,६. रानबेन्नूर (हवेरी)-आर. शंकर,७. हाग्री बोम्मनहल्ली (विजयनगर)- सुगुना के,८.विराजपेट (कोडोगो)- एस. वाय. एम. मसूद फौजदार,९. नरसिंहराज (मैसूर)-रेहाना बानो




