कर्नाटकमध्ये कॉग्रेसला स्पष्ट बहुमत | मुख्यमंत्रीपदासाठी डि के शिवकुमार,सिध्दरामय्या व मल्लिकार्जुन खरगे यांचेही नाव चर्चेत
राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठेची झालेल्या महाराष्ट्राबाजूच्या कर्नाटकात सत्तांतर झाले असून काँग्रेसला आता स्पष्ट बहुमत मिळणार हे आतापर्यतंच्या कलामधून निश्चित झाले आहे. त्यामुळे भविष्यात दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसच्या आमदारांना आजचं बंगळुरूलात एकत्र जमविण्यात येणार आहे.मतमोजणीचे कल आता एंकदरीत निश्चित झाले आहेत. कॉग्रेसला स्पष्टपणे सत्ता मिळाली आहे.निकाल जाहीर होत असतानाही कर्नाटकातील राजकीय घटनांना वेग आला आहे.
मुख्यमंत्री पदासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के शिवकुमार आणि नेते सिध्दरामय्या यांना हायकमांडने दिल्लीला बोलावल्याचे कळते आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंतचं कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण हे निश्चित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.एंकदरीत कर्नाटकातील कॉग्रेसचा विजयामुळे देशभरात विरोधी पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

हेही वाचा-राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटकात या ९ मतदार संघात उमेदवार उभे होते? वाचा यादी!
कर्नाटकातील या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी माजी मुख्यमंत्री सिद्धारमय्या आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांचं नावे सर्वाधिक चर्चेत आहेत.आता काँग्रेसचे जेष्ठ नेते परमेश्वर आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे याचंही नाव आता पुढे येत आहे. बेळगाव जिल्ह्यातील सतिश जारकीहोळी हेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असू शकतात असंही कळतयं.