बेडग : वडील पैसे देत नाही,जमिनही नावावर करत नाही,या रागातून मुलाने पित्याला ट्रँक्टरखाली चिरडून मारल्यांची ह्रदयद्रावक घटना बेडग ता.मिरज येथे घडली आहे.यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.दाजी गजानन आकडे ( वय 70) यांच्या खूनप्रकरणी मुलगा लक्ष्मण आकळे (वय 32) याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी, बेडग येथील शेतकरी दाजी आकळे व त्यांचा मुलगा लक्ष्मण आकळे हे एकत्र राहतात.बापलेकात गेल्या काही दिवसापासून पैसे व जमीन नावावर करण्यावरून वाद सुरू होता.मुलगा लक्ष्मण वडील दाजी यांच्याकडे सतत पैशाची मागणी करीत होता.त्याचबरोबर त्याला मिळणाऱ्या हिस्स्याची जमीन नावावर करून द्यावी म्हणून त्याने वडिलांच्या मागे तगादा लावला होता.मात्र त्यास पैसे देण्यास व जमीन नावावर करून देण्यास वडील नकार दिला होता.
याच रागातून लक्ष्मण याने आज बुधवारी सकाळी रस्त्याने जात असलेले वडिल दाजी यांच्या अंगावरुन थेट ट्रॅक्टर घातला.
याच रागातून लक्ष्मण याने आज बुधवारी सकाळी रस्त्याने जात असलेले वडिल दाजी यांच्या अंगावरुन थेट ट्रॅक्टर घातला.
त्यात ते ट्रॅक्टरखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी तातडीने बेडग येथे पोहचत लक्ष्मण आकळे यास ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले आहे.वडिलांच्या खून प्रकरणी त्यांच्याविरूध गुन्हा दाखल करुन पोलीसांनी त्याला अटक करण्यांत आली आहे.