धक्कादायक | मुलांने वडिलाला टँक्टर खाली चिरडले | बेडग येथील घटना : पित्याचा मृत्यू,मुलास अटक

बेडग : वडील पैसे देत नाही,जमिनही नावावर करत नाही,या रागातून मुलाने पित्याला ट्रँक्टरखाली चिरडून मारल्यांची ह्रदयद्रावक घटना बेडग ता.मिरज येथे घडली आहे.यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे.दाजी गजानन आकडे ( वय 70) यांच्या खूनप्रकरणी मुलगा लक्ष्मण आकळे (वय 32) याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
याच रागातून लक्ष्मण याने आज बुधवारी सकाळी रस्त्याने जात असलेले वडिल दाजी यांच्या अंगावरुन थेट ट्रॅक्टर घातला.