मिरजेत ७४ वर्षीय रुग्णावर बायपास टाळून अँजिओप्लास्टी यशस्वी

0
सांगली : हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमचे दोन ब्लॉक झाल्याने हृदयविकार उद्भवलेल्या ७४ वर्षीय वृद्ध रुग्णास बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होत. मात्र डॉ. रियाज मुजावर यांनी रुग्णाचे वय आणि त्यांची शारीरिक स्थिती लक्षात घेता अँजिओप्लास्टी द्वारे उपचार करण्याचे ठरवले. अतिशय किचकट अशी शस्त्रक्रिया अत्याधुनिक इंट्रा व्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी तंत्रज्ञानाचे वापर करून यशस्वी करण्यात आली. यानंतर रुग्ण सामान्य स्थितीत असून यशस्वी उपचारांबद्दल रुग्ण व त्याच्या नातेवाईकांनी डॉ. रियाज मुजावर यांचे आभार व्यक्त केले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोला येथील शामराव मारुती गाडे (वय ७४) हे छातीत दुखू लागल्याने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांची तपासणी केली असता हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमचे दोन ब्लॉक आढळून आले. अशा स्थितीत रुग्णावर बायपास शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. तसा सल्ला त्यांना देण्यात आला होता. मात्र रुग्ण व त्याचे नातेवाईकांची बायपास शस्त्रक्रिया करण्याची इच्छा नव्हती. याबाबत त्यांनी डॉ. रियाज मुजावर यांच्याशी संपर्क साधला. डॉ. रियाज मुजावर यांनी या स्थितीमध्ये अँजिओप्लास्टी करून रुग्णावर उपचार करण्याचे ठरविले. मात्र रुग्णाच्या हृदयातील ब्लॉक व त्यांची स्थिती पाहता नियमित अँजिओप्लास्टी करून भागणारे नव्हते. त्यासाठी त्यांनी आय.व्ही.एल. (इन्ट्रा व्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी) या तंत्रज्ञानाचा वापर केला.

 

रुग्णाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमचा ब्लॉक असलेल्या ठिकाणी या तंत्रज्ञानाद्वारे स्टेंड बसविण्याकरिता अनुकूल स्थिती निर्माण करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी स्टेंट बसवून रुग्णाच्या हृदयातील रक्तवाहिन्यातील अडथळा दूर करण्यात आला. अतिशय किचकट व गुंतागुंतीच्या असलेल्या या शस्त्रक्रियेस तब्बल अडीच तासांचा वेळ लागला. मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याचा वापर करून डॉ. रियाज मुजावर यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. डॉ. मुजावर यांनी याबाबतचे प्रशिक्षण व अनुभव सत्यसाई हॉस्पिटल तसेच जगातील आघाडीच्या मानल्या जाणार्या अमेरिकेतील क्लिवलन क्लिनिक येथे घेतले आहे. त्यांनी येथे केलेल्या सराव आणि आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग मिरज सांगली परिसरातील रुग्णांना होत आहे.

 

Rate Card
नव्या तंत्रज्ञानाद्वारे सात शस्त्रक्रिया –
डॉ. रियाज मुजावर यांनी मिरजेत इंट्रा व्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी तंत्रज्ञान अँजिओप्लास्टीसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यांनी येथे या तंत्रज्ञानाचा वापर करून अँजिओप्लास्टी करण्यास सुरुवात केली आहे. मागील सहा महिन्यात अशा प्रकारच्या सात शस्त्रक्रिया त्यांनी येथे यशस्वी केल्या आहेत. पूर्वी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबई किंवा पुणे येथील रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. यामध्ये रुग्णांचा वेळ, पैसे खर्च होत होते. मिरजेत हेच तंत्रज्ञान आणि वैद्यकीय सुविधा कमी खर्चामध्ये उपलब्ध होऊ लागली आहे. यामुळे डॉ. मुजावर यांच्याकडे रुग्णांचा ओघ वाढत आहे. डॉ. मुजावर यांनी यापूर्वी आयवस, ओसिटी, आयवल आणि रोटा ॲब्लेशन असे आधुनिक तंत्रज्ञान वापरून अनेक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. त्याचा रुग्णांना लाभ झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.