जत : जत बस स्थानकाचा कारभार बेभरवशाचा झाला आहे.या कारभारात सुधारणा करून जनतेची होणारी गैरसोय थांबवावी,अन्यथा आंदोलन करणार असल्याचे युवा नेते विक्रम ढोणे यांनी आगार प्रमुख सौ.देसाई यांना भेटून सांगितले.जत स्थानकातून एकही बस वेळेवर बाहेर पडत नसल्याने प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे, अगोदरच उन्हाचा पारा चढला असताना वेळेवर बस मिळत नसल्याने जेष्ठ नागरिक,महिला प्रवासी, लहान मुले यांचे हाल चालू आहेत.
त्यामुळे स्थानक प्रमुखांनी बसेस येण्याजाण्याचे नियोजन व्यवस्थित करून कामकाजाची सुधारणा करून प्रवाशांची होणारी गैरसोय तातडीने थांबवावी.मंगळवार सकाळी साडे अकराची बस क्रमांक ३५५५ जत सांगली १ वाजताची, १:३० ची जत कोल्हापूर, १२:३० ची भिवर्गी दुपारी दोन वाजेपर्यंत बस जत बसस्थानकात वाहकाविना प्रवाशी बसून होती. अकरा ते दोनपर्यंत एकही बस जत सांगली महामार्गावर धावली नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले गैरसोय झाली. तसेच महामंडळाचे आर्थिक नुकसानही झाले.रात्री खेड्यागावतून वस्तीवर जाण्यास खूप वेळ लागतो आहे कुंभारी मार्गे सांगली नॉनस्टॉप गाडी सुरू करण्याची मागणी आहे.
एकही बस वेळेवर नाही
एकही बस वेळेवर सुटत नाही यांची सांगली विभाग नियंत्रक भोकरे यांनी या गंभीर प्रकारची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची अशी मागणी ढोणे यांनी केली आहे.