पाण्यासाठी शेतकरी,नाग विहिरीत पडले | शेतकऱ्यांचा मृत्यू,सर्प मित्रांनी धाडसाने रेस्क्यू करत नागाला दिले जीवदान

0
जत : उन्हाच्या तीव्र झळा,माणसासह प्राण्यांनाही असह्य होत असून शेतीतील पिके वाचविण्यासाठी शेतकरी धरपडत आहेत.तर प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी जीवाशी धोका पत्करत आहेत.अशीच एक दुर्देवी घटना जत तालुक्यातील जिरग्याळ येथून समोर आली असून विहिरीत पडल्याने रविंद्र संकपाळ या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.मात्र विहिरीतील शेतकऱ्यांचा मृतदेह काढण्यासाठी गेलेल्यांना पुढील चित्र धक्का बसला.कारण जिव वाचविण्यासाठी तरंगणाऱ्या शेतकऱ्यांच्या मृतदेहावर एक नाग फणा काढून बसला होता.त्यामुळे मृतदेह बाहेर काढायचा कसा? अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
काही दिवसापुर्वी रवींद्र संकपाळ हा शेतकरी आपल्या शेतामध्ये पाणी सोडण्यासाठी म्हणून विहिरीकडे गेला होता. रात्रीच्या सुमारास पाणी सोडत असताना विहिरीमध्ये पडून रवींद्र संकपाळ यांचा मृत्यू झाला.घटनेनंतर कुंटुबियांनी शोधाशोध केली मात्र ते आढळून आले नाही.तीन दिवसानंतर संकपाळ यांचा मृतदेह विहिरीमध्ये तरंगत आढळून आला.मात्र खोल असणाऱ्या विहिरीला पायऱ्या नसल्याने मृतदेह बाहेर कसा काढायचा? हा प्रश्न निर्माण झाला होता.संकपाळ यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली.

 

Rate Card

विहिरीजवळ मोठ्या संख्येने गावकरी जमा झाले.मृतदेह विहिरीतून काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.मात्र सर्वजण मृत्तदेह काढण्यासाठी प्रयत्न करत असतनाच त्यांना धक्का बसला.विहिरीत तरंगत असलेल्या शेतकऱ्याच्या मृतदेहावर एक नाग फणा काढून बसल्याची बघून सर्वांची गाळण उडाली.

तीव्र उन्हाच्या झळामुळे पाण्याच्या शोधात नाग देखील विहिरीमध्ये पडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.मात्र अशा स्थितीत मृत्तदेहावर नाग बसल्याने तो बाहेर काढण्याचा कसा असा प्रश्न नातेवाईकासमोर पडला होता.
डफळापूर परिसरात प्रसिद्ध असणारे

सर्पमित्र असणाऱ्या रोहन शेलार आणि मोहसिन शेख यांना गावकऱ्यांनी बोलविले.सर्प मित्रांनी नागाला बाहेर काढण्यासाठी धोका पत्करत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.अत्यंत धाडसाने,सावधपणे सर्प मित्र रोहन शेलार दोरीच्या साह्याने विहिरीत उतरले.
मृतदेहाच्या अंगावर फणा काढून बसलेल्या नागाला त्यांनी अलगदपणे उचलून घेतलं.आणि दोरीच्या साह्याने नागाला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.त्यानंतर नातेवाईकांनी मृत्तदेह बाहेर काढला.जत तालुक्यातील जिरग्याळ येथे घडलेल्या व सर्पमित्रांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.सर्वत्र बघितला जात आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.