जत: येथे शेतातील “आंबे का तोडत आहे”,असे विचारताच शेतकऱ्यालाच दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.शामराव भीमराव शितोळे (रा. रामपूर) हे जखमी झाले. याप्रकरणी राजू पवार(रा. दुधाळ वस्ती, जत) याच्यावर गुन्हा दाखल झाला.
याबाबत जत पोलिसात फिर्याद दिली.शितोळे यांची जत हद्दीत शेती आहे. त्यांच्या शेतात दोघे आंबे काढत असल्याचे दिसले. त्यांना विचारणा केली. त्यावेळी यातील एकाने पलायन केले. तर दुसरा संशयित राजू पवार याने शिवीगाळ करीत दगडाने शितोळे यांना मारहाण केली. यात शितोळे जखमी झाले.