पिएम घरकूलच्या हप्त्यासाठी लाचेची मागणी,पंचायत समितीचा कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

सांगली : पिएम आवास योजनेतील घरकूल बांधकामाचे मंजूर निधीतील हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करून देण्याच्या मोबदल्यात १३ हजारांची लाच स्विकारताना कवठेमहाकांळ पंचायत समितीच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायकास लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. अजित मुबारक मुल्ला (वय ४७, रा. शासकीय निवासस्थान, नगरपंचायत चौक, कवठेमहांकाळ) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. कवठेमहांकाळ शहरातील म्हसोबा गेटजवळ सापळा लावून ही कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता, मुल्ला याने २० हजारांची लाच मागून तडजोडीअंती १३ हजार रुपयांची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले होते. मंगळवारी म्हसोबा गेटजवळ ‘लाचलुचपत’ने सापळा लावला होता. यावेळी मुल्ला याने लाचेची मागणी करत ती स्विकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.