प्रकाश जमदाडे यांना तालुक्यांचे नेतृत्व करण्याची संधी | – खा.संजयकाका पाटील

0
जत : मागील २५ वर्षापासून जतच्या समाजकारण, राजकारण, उद्योग, सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांचे कार्य संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा नेता अशीच त्यांची ओळख आहे.जतमधील सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी झटणारे, म्हैसाळच्या पाण्यासाठी लढा देणारे संचालक प्रकाश जमदाडे यांना समाजकार्यासाठी येणाऱ्या काळात निश्चित बळ देवू अशी ग्वाही सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.

 

 

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्या वाढदिवसानिमित्त जत येथे प्रकाशराव जगदाडे फौंडेशनच्या वतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १२५ हुन अधिक महिलांची तपासणी करण्यात आली. तसेच जत शहरातील महिलांना ॲनिमिया मुक्त करण्याचा संकल्प फौंडेशनच्या वतीने करण्यात आला.

 

 

या शिबिराचे उदघाटन खा. संजयकाका पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय सिमेंट बोर्डाचे संचालकभाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. रवींद्र आरळी, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, राष्ट्रवादीचे नेते सिद्धूअण्णा शिरशाड, जतचे माजी नगरसेवक मोहनभैय्या कुलकर्णी, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र सावंत,  जय मल्हार फौंडेशनचे हेमंत चौगुले, रामन्ना जीवनावर, मंगेश सावंत, मिलिंद पाटील, विठ्ठल निकम, उत्तम चव्हाण, अविनाश वाघमारे, रवींद्र मानवर, नाथा पाटील, अविनाश गडीकर, चिदानंद चौगुले, डॉ मदन बोर्गीकर, श्रीपाद अष्टेकर योगेश व्हनमाने, फौंडेशनचे अध्यक्ष अभय जमदाडे, सचिव विजय रुपनूर आदी उपस्थित होते.

 

खा.पाटील म्हणाले, प्रकाश जमदाडे यांनी आतापर्यंत तालुक्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. म्हैसाळ योजना पूर्णत्वास नेण्यासाठी माजी आमदार विलासराव जगताप नंतर पाठपुरावा कोणी केला असेल तर जमदाडे यांनीच केला आहे हे मान्यच करावे लागेल. तालुक्याची सतत तळमळ असणाऱ्या या कार्यकर्त्याने जिथे संधी मिळेल तिथे सोनं केले आहे. बाजार समितीचे सभापती म्हणून उल्लेखनीय काम त्यांनी केले. त्यांच्या पत्नी पंचायत समितीचे सभापती झाल्या त्यांनीही वेगळा ठसा उमटविला. शासन व प्रशासन दरबारी अभ्यासपूर्ण माहिती मांडून समस्यांचे निराकरण करण्याची सचोटी जमदाडे यांच्याकडे आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टीचे कामही चांगल्या प्रकारे केले आहे आता त्यांना तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळायला हवी.
डॉ. रवींद्र आरळी म्हणाले, कोणत्याही निवडणुकीचे किंवा राजकीय कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्याचा हातखंडा प्रकाशराव जमदाडे यांच्याकडे आहे. त्यांनी बाजार समितीचे सभापतीपदी काम करताना शहरासह तालुक्याचा विकास करण्यावर भर दिला. विविध समस्यांसाठी ते सतत आंदोलन, निवेदन देऊन शासन प्रशासनाचे लक्ष वेधत असतात. जिल्हा बँकेचे संचालक म्हणून जिल्ह्यात वेगळा ठसा त्यांनी उमटविला आहे. भविष्यात त्यांना सहकार्य करू अशी ग्वाही डॉ. आरळी यांनी दिली.
प्रस्ताविक करताना जत सोसायटीचे माजी चेअरमन मोहनभैय्या कुलकर्णी म्हणाले, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणारा नेता म्हणून प्रकाश जमदाडे यांना ओळखले जाते. तालुक्याचा संपूर्ण अभ्यासपूर्ण माहिती असणाऱ्या जमदाडे साहेबानी बाजार समितीचे सभापती म्हणून काम करताना शहरात छ. शिवाजी महाराज व्यापारी संकुल उभे करून शहराच्या वैभवात भर घातली. आपल्या विविध व्यवसायातून तालुक्यातील बेरोजगार युवकांना काम दिले आहे. जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करताना शेतकरी केंद्र बिंदू मानून काम करीत आहेत. शेतकऱ्यांसाठी ओटीएस सारखी योजना राबवून तालुक्यातील सोसायट्याना उर्जितावस्थेत आणल्या आहेत. सर्वसामान्याची तळमळ असणाऱ्या या नेत्याला विधानसभेत काम करण्याची संधी मिळावी ही तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, हेमंत चौगुले यांनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.
★संधीचे सोने करू- प्रकाश जमदाडे
सत्काराला उत्तर देताना जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे म्हणाले, ज्यावेळी काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी तालुक्यातील सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेऊन काम करीत आलो आहे. खा. संजयकाका पाटील , माजी आमदार विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. बाजार समितीनंतर जिल्हा बँकेत काम करण्याची संधी मिळाली याचा फायदा दुष्काळी तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना व्हावा यासाठी प्रयन्त करत आहे. भविष्यात नेतृत्वाची संधी मिळाल्यास तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
★ वाढदिनाच्या कार्यक्रमात चर्चा आमदारकीची
कार्यक्रमाच्या प्रारंभी खा. संजयकाका पाटील यांच्या हस्ते संचालक प्रकाश जमदाडे यांचा वाढदिनी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमावेळी संचालक प्रकाश जमदाडे आमदार व्हावेत अशा भावना अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविल्या हाच धागा पकडत खासदार संजयकाका पाटील यांनी जमदाडे साहेबांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले. डॉ रवींद्र आरळी यांनीही आपल्या मनोगतात जमदाडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू, त्यांना बळ देऊ असे सांगितले. खासदार पाटील व डॉ आरळी यांची जमदाडे यांना साथ असल्याची चर्चा रंगली होती.
■ २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीचे फुंकले रणशिंग
वाढदिनी संचालक प्रकाश जमदाडे यांच्या समर्थकांनी प्रकाश जमदाडे यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी करण्याचा संकल्प करत २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकत प्रकाश जमदाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
■ पाच हजाराहून अधिक शालेय साहित्य जमा
 वाढदिनी बुके नको बुक द्या असे आवाहन प्रकाशराव जमदाडे फौंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाढदिनी संचालक प्रकाश जमदाडे यांना सदिच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी शालेय साहित्य भेट देत शुभेच्छा दिल्या. पाच हजाराहून अधिक वह्या व शालेय साहित्य जमा झाले आहे. जमा झालेले साहित्यात फौंडेशनच्या वतीने आणखी वह्या व अन्य शालेय साहित्य वाढवून त्या साहित्याचे वाटप लवकरच विद्यार्थ्यांना करण्यात येणार असल्याचे फौंडेशनचे अध्यक्ष अभय जमदाडे यांनी सांगितले.
■■
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.