येळवीजवळ भिषण अपघात,२ ठार

0
5

जत : जत तालुक्यातील येळवी जवळ रस्त्याकडेला चारचाकी गाडी पलटी होवून झालेल्या अपघातात शेजारील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अभिषेवाडी येथील दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.

 

सांगोला तालुक्यातील अभिषेवाडी येथील सुखदेव बिरा खरात ( वय-३६), दगडू शंकर करांडे (वय ३५ )व बापू धोंडिबा शिंदे हे त्यांच्या (वय-४० ) हे तिघे त्यांच्या मित्राची ईरटीका ( एमएच १० बीएम-८४२८ ) गाडी घेवून गेले होते. जतहुन गावी अभिषेवाडी येथे निघाले असता येळवी हद्दीतील कुरणाजवळ भरघाव वेगाने निघालेल्या गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटला.

 

भरघाव वेगात असलेली गाडी रस्त्याकडेला असलेल्या साइडपट्टीवरून खाली गेली. खाली असलेल्या झाडाला जोराची धडक देवून गाडी पलटी झाली. गाडीतील दोन्ही एअर बॅगा उघडल्या होत्या. गाडीने ज्या झाडाला धडक दिली ते झाड बुडातून मोडले यावरून गाडी किती वेगाने झाडाला धडकली याचा अंदाज येवू शकतो.

 

या घटनेत सुखदेव बिरा खरात, दगडू शंकर करांडे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर बापू धोंडिबा शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here