रांजणी : येथे आजी-माजी सैनिक सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी संस्थापक चेअरमन कैलासवासी कॅप्टन पतंगराव भोसले परिवर्तन पॅनलने रांजणी येथील हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
प्रचारावेळी बोलताना तात्यासाहेब भोसले म्हणाले,संस्थापक 1990 च्या दशकात सैनिकांना होणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन सैनिक आणि माजी सैनिकांच्या आर्थिक अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या संस्थेची उभारणी केली आणि या संस्थेने आतापर्यंत चार शाखा तयार केल्या.
त्यामध्ये प्रामुख्याने रांजणी, कवठेमंकाळ, ढालगाव,शिरढोण अशा गावांचा समावेश आहे.या संस्थेच्या माध्यमातून सर्व सभासदांना कर्ज देऊन त्यांच्या आर्थिक शैक्षणिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला गेला.परंतू गेली दहा वर्षे सत्तेत असणाऱ्यां सत्ताधाऱ्यांनी सैनिकांसाठी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये सिविल लोकांना प्राधान्य देऊन ज्यांचा या संस्थेची काही संबंध नाही,त्यांना कर्ज देऊन सैनिकांच्या समस्या सोडविण्यापेक्षा सिविल लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला गेला, सैनिक आणि माजी सैनिकांच्या पैशाचा वापर सैनिकांच्या समस्या ऐवजी सिविल लोकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले गेले, रौप्य महोत्सव साजरा केलेला खर्च हा सर्वसाधारण एक लाखापर्यंत असताना सुद्धा हा खर्च सात लाखावर दाखवून सैनिकांची तसेच संस्थेची दिशाभूल केली गेली आहे.
ज्या तळमळीने संस्थापकांनी ही संस्था स्थापन केली गेली तोच विचार आणि तोच दृष्टिकोन आम्ही घेऊन सैनिकांच्या आर्थिक अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने आमचे पॅनेल पूर्णपणे काम करेल त्यासोबतच या संस्थेमध्ये आत्ताच्या आधुनिक बँकिंग प्रमाणे डिजिटल सोयींचा समावेश करणार असल्याची घोषणा केली गेली.
बस-ट्रकचा भिषण अपघात | २२ प्रवासी गंभीर | सांगोला-विजापूर बसला ट्रकची पाठीमागून धडक
यावेळी रांजणी, ढालगाव,कवठेमंकाळ,शिरढोन,बाज,नागज, जाखापूर, लोणारवाडी,आगळगाव, करोली, शिरढोण, बोरगाव, एरंडोली, मल्लेवाडी, सलगरे, बेळंकी,डफळापुर,घाटनांद्रे, कुकटोळी,बोरगाव, कुची,खरशिंग, देशिन या सर्व भागातून जवळपास 500 च्या वर सैनिक माझी सैनिक उपस्थित होते.
यावेळी पॅनल प्रमुख शिवाजीराव भोसले , तानाजीराव भोसले, रामकृष्ण पाटील, अजितराव खराडे भानुदास भोसले , किशोर पाटील, उदय भोसले यांनी मनोगत व्यक्त करून त्यांना मिळालेला विमान या चिन्हावर जास्तीत जास्त मतदान करून सर्वच्या सर्व जागा जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.