जत : एस.टी. महामंडळ जत आगाराच्या ताफ्यात आलेल्या नव्या 25 एस.टी. बसेसचे लोकार्पण केले. ग्रामीण भागाची मुख्य अर्थवाहिनी म्हणून सदैव धावणाऱ्या या एसटी बसेसचे महत्त्व आपण सर्वचजण जाणतो. मात्र जत आगारातील अनेक बसेस दुरुस्तीस आल्याने व काही बसेस कालबाहय झाल्याने नव्या बसेसची मोठी गरज होती. या नव्या २५ एसटी बसेस जत आगारात दाखल झाल्याने प्रवाशांना विशेषतः खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना व नोकरदार बांधवांना लाभ होणार आहे.या एसटी बसेसचे लोकार्पण आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते.
विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या जत डेपोला प्रथमचं नव्या २५ बसेस मिळाल्या आहेत.यापुर्वी जून्या बसेस व अन्य डेपोला वापरलेल्या बसेसवरचं या डेपोचा भार होता.सातत्याने या बसेसबाबत प्रवाशाची नाराजी व्यक्त होत होती.यंदा मात्र सर्वाधिक बसेस मिळाल्याने आगाराचे वेळापत्रक व्यवस्थित होण्यास मदत मिळणार आहे.
जत तालुक्यात नव्या कोर्या बसेस आता धावणार आहेत.चालक,वाहकांसह कर्मचाऱ्यांतही यामुळे उत्साह संचारला आहे.
जत एसटी आगाराला मिळालेल्या बसेसचे लोकार्पण करताना आमदार विक्रमसिंह सावंत व मान्यवर