एम.आर.पी. पेक्षा जादा दराने खते खरेदी करू नका

0

सांगली : खरीप हंगाम 2023 मध्ये  शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा पुरवठा योग्य रीतीने होण्याच्या दृष्टीने सांगली जिल्ह्यामध्ये आज अखेर रासायनिक खतांच्या 89 हजार 230 मेट्रीक टन मागणी पैकी 84 हजार 208 मेट्रीक टन रासानिक खते उपलब्ध झाली आहेत. जिल्ह्यामध्ये रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. चालू खरीप हंगामामध्ये  रासायनिक खतांचे ग्रेड निहाय दरपत्रक शेतकऱ्यांच्या माहितीसाठी देण्यात येत आहे. ही खते एम.आर.पी. पेक्षा जादा दराने खरेदी करू नयेत. अनुदानित रासायनिक खतांची  विक्री एम.आर.पी. पेक्षा जादा दराने होत असल्यास शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे.

 

रासायनिक खतांचे दरपत्रक पुढीलप्रमाणे.

Rate Card
अ.क्र खताचे नाव दर / बॅग वजन (कि.ग्रॅम)
युरिया २६६.५०/- ४५
डी.ए.पी. १३५०/- ५०
एम.ओ.पी.P १७००/- ५०
१०:२६:२६ १४७०/- ५०
१२:३२:१६ १४७०/- ५०
२४:२४:०० १७००/- (पी.पी.एल.) ५०
१४:२८:१४ १७९५/- (पी.पी.एल.) ५०
२४:२४:०:०८ १५००/- (कोरोमंडल) ५०
१४:३५:१४ १५००/- (कोरोमंडल) ५०
१० २४:२४:०:०८ १७००/- (महाधन) ५०
११ २०:२०:०:१३ १३००/- (महाधन) ५०
१२ १४:२८:०० १४९५/- (महाधन) ५०
१३ ०९:२४:२४ १७९०/- (महाधन) ४०
१४ ०८:२१:२१ १७५०/- (महाधन) ४०
१५ १५:१५:१५ १४७०/- ५०
१६ २०:२०:०:१३ १३००/- (आर.सी.एफ.) ५०
१७ २०:२०:०:१३ १२००/- (इफको) ५०
१८ २०:२०:०:१३ १२५०/- (आय.पी.एल.) ५०
१९ २०:२०:०:१३ १२००/- (चंबल) ५०
२० एस.एस.पी.(पावडर) ५३०/-(पी.पी.एल.) ५०
२१ एस.एस.पी.(ग्रॅन्युलर) ५७०/- (पी.पी.एल.) ५०
२२ एस.एस.पी.(पावडर) ५०५/- (श्री पुष्कर) ५०
२३ एस.एस.पी.(ग्रॅन्युलर) ५४५/-(श्री पुष्कर) ५०
२४ एस.एस.पी.(ग्रॅन्युलर झिंकेटड) ५७५/- (श्री पुष्कर) ५०
२५ एस.एस.पी.(पावडर) ५१०/- (रामा) ५०
२६ एस.एस.पी.(ग्रॅन्युलर) ५५०/-(रामा) ५०

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.