सांगली जिल्ह्यात पाणी उपसाबंदी | म्हैसाळ,टेंभू सिंचन योजना बंद होणार ?

0

सांगली : कोयना धरणातून कमी करण्यात आलेला विसर्ग तसेच कृष्णा नदीने गाठलेल्या तळामुळे कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. कृष्णा नदीतून शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर उपसाबंदी आदेश जारी करण्यात आला आहे. केवळ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा करणाऱ्या योजना सुरु राहणार आहेत. बुधवारपासून उपसाबंदी आदेश लागू होणार असून तो 17 जूनपर्यंत असेल. त्यानंतर 18 ते 20 जून या कालावधीत उपसा करता येणार आहे. तसेच पर्जन्यमानानुसार व परिस्थितीनुसार पुढील नियोजन करण्यात येणार आहे.

वरील नमूद केलेल्या कालावधीमध्ये पिण्याचा पाणीपुरवठा सोडून इतर कारणांसाठी कृष्णा नदीतून उपसा केल्यास संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येणार आहे. तसेच सामग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही पाटबंधारे विभागाच्या आदेशात म्हटले आहे. ताकारी योजना आजपासून बंद करण्यात आली आहे, तर केवळ टेंभू आणि म्हैशाळ अंशतः सुरू आहेत.

चांदोली धरण व अभयारण्य प्रवेश पर्यटकांसाठी बंद
दरम्यान, चांदोली धरण व अभयारण्य प्रवेश पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. चांदोली अभयारण्य, चांदोली धरण व परिसरात अतिवृष्टी असते. दरम्यान, चांदोली धरणात 11.87 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाण्यापैकी 5 टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. किमान दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा धरणात सध्या उपलब्ध आहे. धरण प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे 5 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा यावर्षी शिल्लक आहे. यंदा अजूनही दमदारपणे मान्सून दाखल झाला नसल्याने आतापर्यंत केवळ 2 मिलि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

 

Rate Card

तर कोयना धरणात दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा दुसरीकडे, कोयना धरणातून पिण्यासाठी एक टीएमसी पाण्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे मोसमी पावसाचे आगमन लांबल्यास कोयना धरणामध्ये केवळ दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे कोयनेतील पाण्याचे जपूनच नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे.

 

सध्या 1 हजार 50 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्याचा थेट परिणाम सांगली-मिरज शहरावर होत आहे. त्यामुळे सांगली महापालिकेकडूनही पाण्याचे नियोजन सुरु आहे. संपूर्ण जून महिन्यात पाणी अत्यंत जपून वापरण्याचे पाटबंधारे विभागाचे धोरण आहे. पाऊस लांबला तर अडचण होऊ शकते, या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. दुसरीकडे, चांदोली धरणात 12 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.