उमदी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारची कर्ज उपलब्ध करून देण्यात आली आहेत.ओटीएस योजना 30 जून 2023 अखेर लागू आहे.थकबाकीदार शेतकरी सभासद यांना व्याज माफी होणार आहे. त्याचा लाभ घ्यावा म्हणून शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत जावून ओटीएस योजनेची माहिती जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली.
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. निगडी बु,उमदी, सुसलाद,हळ्ळी,बालगांव, बोर्गी बु, बोर्गी खु, करजगी येथे सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन,सदस्य व सभासद शेतकरी यांच्या सोसायटी मध्ये बैठक घेऊन अडचणी समजून घेतल्या.यावेळी मुख्य कार्यालयाकडून सरव्यवस्थापक काटे साहेब ,मुलानी साहेब,तालुका अधिकारी राजू कोळी,नाटेकर साहेब व शेतकरी उपस्थित होते.