जत: बालगाव (ता, जत) येथे जागतिक योग दिनानिमित्त २१ जून रोजी श्री गुरुदेव आश्रमात ग्रामीण योग महोत्सवाचे आयोजन केले आहे. यात सुमारे १५ हजार साधक सहभागी होणार असल्याची माहिती श्री गुरुदेव आश्रमचे डॉ. अमृतानंद स्वामी व भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले, योग ही’भारताने जगाला दिलेला अनेक देणग्यांपैकी एक सर्वश्रेष्ठ देणगी आहे.
योग हा एक अद्भुत जन-विज्ञान यांचा महासंगम, ऋषी-मुनी हेच संशोधक.आज संपूर्ण जगात याचा प्रचार झालेला आहे. त्याचे मुख्य कारण योग हे शारीरिक,मानसिक, बौद्धिक आत्म्याचे विकास साध्य करीत आहे, अशी माहिती डॉ.अमृतानंद स्वामी यांनी दिली,तर या योग महोत्सवात १५ हजारांहून अधि साधक सहभागी होणार आहेत.सर्वांनी आपले जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रवी पाटील यांनी केले आहे.