जत तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांचा ४६ लाखांचा गंडा

0
जत: जत तालुक्यातील गुगवाड, उमराणी, डफळापूर येथील नऊ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची ४६ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. याबाबत शेतकऱ्यांनी पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांना निवेदन दिले.शेतकऱ्यांनी शशांक शामराव सरगर ( खलाटी, ता. जत) या द्राक्ष व्यापाराला द्राक्षे दिली होती. सरगर याने काही रक्कम शेतकऱ्यांना दिले आहेत.
उर्वरित पैसे दहा दिवसांनी देतो असे सांगितले होते. परंतु पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्रित येत याबाबतचे निवेदन पोलिसांना दिले.यांना निवेदनात‌ म्हटले आहे की, व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करावी, अन्यथा प्रांत कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.जत पूर्व, पश्चिम, दक्षिण भागात द्राक्ष उत्पादकांचे क्षेत्र मोठे आहे.अनेक गावात द्राक्ष बागायतदारांना गंडा घालून सरगर हा फरार झाला आहे.शेतकऱ्यांनी सरगर याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने फोन बंद ठेवल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
Rate Card
यासंदर्भात लवकरच पालकमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.जत तालुक्यात सातत्याने असे प्रकार घडत असून संबधित यंत्रणांनी हंगाम सुरू होताच सतर्क राहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत असे दरवर्षी नवनविन व्यापारी तयार होतात आणि शेतकऱ्यांना लाखो रूपयांचे गंडा घालत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.