उमदीत अनियमित विजपुरवठ्याने मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले

0
उमदी : येथे अनियमित वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत दिवसेंदिवस इलेक्ट्रिक मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांसह पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी उमदी वीज मंडळ कार्यालयावर धडक देत तत्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
यावेळी सहायक अभिंयता श्री गुरव यांनी कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून काही जणांकडून आकडे टाकून वीज चोरी होत असल्याने वीज पुरवठा अनियमित होत असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.
Rate Card
दरम्यान कारवाई केल्यानंतर अडचणी येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.यापुढे आकडे टाकणाऱ्यावर कठोर कारवाई करावी.मागणी असणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडण्या द्याव्यात,अशी मागणीही समितीच्या कार्यकर्त्यांनी केली.यावेळी निवृत्ती शिंदे,अनिल शिंदे, सुनील पोतदार, गोपाल माळी,आप्पू कोरे, अरविंद मुंगळे, पिंटू कोकळे, हणमंत बिराजदार, योगेश वागदारी,आणाप्पा भुंयार, हारुण अत्तार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.