जयसिंगपूर: संजय घोडावत विद्यापीठाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शाहू विचारांची व कार्याची ओळख व्हावी हा याचा उद्देश आहे.
ही स्पर्धा शालेय गट 9 व10 वी गट महाविद्यालयीन 11 व 12 वी आणि पदवी गट यामध्ये होणार आहे. यासाठी अनुक्रमे एक,दोन आणि तीन हजार शब्द मर्यादा ठेवण्यात आली आहे.एकूण 26 हजार रुपया पर्यंतची बक्षिसे आहेत.
यासाठी विषय शालेय-शाहू महाराजांचे शैक्षणिक धोरण, महाविद्यालयीन – शाहू महाराजांची औद्योगिक व कृषी क्रांती, पदवी- आरक्षण आणि शाहू महाराज असे विषय आहेत. ऑनलाइन निबंध पाठवण्याची अंतिम तारीख 30 जून आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना इ प्रमाणपत्र देण्यात येईल.
विद्यार्थ्यांनी https://cutt.ly/sgu2023 या लिंक वर जाऊन नाव नोंदणी करावी. यासाठी कोणतीही प्रवेश फी नाही. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन स्पर्धा समन्वयक प्रा.बी.बी पुजारी यांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, संचालक डॉ. व्ही.व्ही.कुलकर्णी, अकॅडमिक डीन डॉ. उत्तम जाधव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.