सांगली : मयत कै. उमेश वसंत शिंदे, रा. बलगवडे तासगाव यांनी भारतीय डाक विभाग अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत टाटा अेज या ग्रुप विम्याद्वारे रु 399/- ची अपघाती विमा पॉलिसी 22 ऑक्टोबर 2022 रोजी घेतली होती. दुर्दैवाने उमेश शिंदे यांचा दि. 15 नोव्हेंबर 2022 रोजी अपघाती निधन झाले. भारतीय डाक विभाग, सांगली जिल्हा अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत टाटा अेज या ग्रुप विम्याद्वारे अपघात विमा योजनेंतर्गत 10 लाख रुपयांचा धनादेश 17 जून 2023 रोजी पॉलिसीधारकाच्या वारसांना सुपूर्द करण्यात आला.
टाटा अेज ही योजना भारतीय डाक विभाग इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि टाटा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केलेली विमा सेवा असून यामध्ये रुपये 399/- मध्ये 10 लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षण ग्राहकांना दिले जाते. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही लोकाभिमुख बँक असून प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाचे लाभ पोस्टमनच्या माध्यमातून अदा केले जातात.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जवळच्य पोस्ट कार्यालयाशी अथवा पोस्टमनशी संपर्क साधून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रमेश पाटील, प्रवर अधीक्षक डाकघर, यांनी केले आहे.