संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये पदवी अभियांत्रिकी शिक्षणासाठी एआयसीईटीची मान्यता

0

जयसिंगपूर : अतिग्रे (कोल्हापूर) येथील संजय घोडावत पॉलिटेक्निक च्या नावांमध्ये बदल करून “संजय घोडावत इन्स्टिट्यूट” हि संस्था सुरू करण्यात आली आहे यामध्ये लेव्हल अपग्रेडेशन करून डिग्री इंजिनिअरिंग चा अभ्यसक्रमास ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) नवी दिल्लीची मान्यता मिळाली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी दिली.

संजय घोडावत पॉलिटेक्निकने १० वर्षाच्या कालावधीत एन.बी.ए. मानांकन मिळवलं आहे. दर्जेदार शिक्षण, यशस्वी निकाल व प्लेसमेंट या त्रिसूत्रीतून पालक व विद्यार्थी यांचा विश्वास सार्थ ठरविला आहे. तसेच टुडे रिसर्च अँड रेटिंग्स, नवी दिल्ली या संस्थेमार्फत ”बेस्ट अपकमिंग पॉलीटेक्निक इन महाराष्ट्र ”पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आयोजित उत्कृष्ट प्रयोगशाळा स्पर्धेत संजय घोडावत पॉलीटेक्नीकच्या इलेक्ट्रिकल मशीन लॅबला राज्यात प्रथम क्रमांक मिळालेला आहे.

संजय घोडावत पॉलिटेक्निकने पुढे झेपावत शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ पासून पदविका (डिप्लोमा) अभियांत्रिकी सोबतच पदवी (डिग्री) अभियांत्रिकीची दारे उघडलेली आहेत.या शैक्षणिक वर्षा पासून एआयसीईटी नवी दिल्ली कडून पदविका अभियांत्रिकी सोबतच पदवी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची मान्यता मिळाली असून संजय घोडावत पॉलिटेक्निक (तंत्रनिकेतन) ही संस्था “संजय घोडावत इन्स्टिट्यूट” या नावाने ओळखली जाणार आहे. यामध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंग सोबततच डिग्री इंजिनिअरिंग चे प्रोग्रॅम्स उपलब्ध असणार आहेत. डिप्लोमा व डिग्री इंजिनिअरिंग अंतर्गत मेकॅनिकल इंजिंनिरिंग, सिव्हिल इंजिंनिरिंग , इलेक्ट्रिकल इंजिंनिरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिंनिरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिंनिरिंग या शाखा उपलब्ध आहेत.

Rate Card

 

डिग्री इंजिनिअरिंग चा अभ्यासक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे सोबत संलग्न करण्यात येणार असून यासाठी विद्यापीठाचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.तरी इथून पुढे पदविका (डिप्लोमा इंजिनिअरिंग)सोबत पदवी अभ्यासक्रमासाठी (डिग्री इंजिनिअरिंग) मधील प्रवेध केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेनुसार देण्यात येणार असून, येथे आभियांत्रिकी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध असणार आहेत. येथे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इथून पुढेदेखील गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण तेही अगदी माफक फी मध्ये सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती संस्थेचे चेअरमन संजय घोडावत यांनी प्रसिद्धी माध्यमाच्या प्रतिनिधीस दिली आहे.यावेळी संस्थेचे सेक्रेटरी श्रेणिक घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी उपस्थित होते.

संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून डिग्री इंजिनिअरिंगचे शिक्षण उपलब्ध करून देण्यामागचे महत्वाचे उदिष्ट म्हणजेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना माफक फी मध्ये शासनाच्या सर्व शैक्षणिक सुविधासह जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे.याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा.

 – चेअरमन संजय घोडावत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.