जत तालुक्यात लवकरच उपमुख्यमंत्र्यांचा दौरा

0
3
जत : भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी सभापती तम्मनगौडा रवीपाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कराड येथे भेट घेतली.यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले, प्रवीण दरेकर, महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे उपस्थित होते.
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सेवा, सुशासन व गरीब कल्याणाच्या संकल्पनेला ९ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर देशभरात ‘मोदी ॲट नाइन’ Modi@9 अभियान राबविण्यात येत आहे.जत विधानसभा मतदार संघात मोदी @9 अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविले जात आहे. या अभियान अंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा घेण्यात येणार आहे. सदर सभेचे निमंत्रण तम्मनगौडा रवीपाटील यांनी उपमुख्यमंत्री यांना दिले. हे निमंत्रण त्यांनी स्वीकारले असून जत तालुक्यात लवकरच उपमुख्यमंत्र्यांचा दौरा होणार आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here