मध्यप्रदेशचे शिक्षण मंत्री जयभान सिंह पवैय्या यांंची म्हैसाळ योजनेस विकास तिर्थ येथे भेट
जत : मोदी @ 9 व महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत मध्यप्रदेशचे शिक्षण मंत्री जयभान सिंह पवैय्या यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मल्लाळ ता.जत येथे म्हैसाळ योजनेस विकास तिर्थ येथे भेट दिली, श्री.पवैय्या यांना सदर योजने बद्दल खा.संजयकाका पाटील यांनी माहिती दिली.यावेळी ग्रामस्थां सोबत चर्चा केली.
ग्रामस्थांनी सदर विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी भाजपा जत तालुका यांचे मार्फत स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाशराव जमदाडे,रविंद्र सावंत,दिग्विजय चव्हाण,चंद्रकांत गुड्डोडगी,भैय्या कुलकर्णी,मोहन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.