राणी मुचंडी हाफ मॅरथॉन करिता धावणार चीनच्या ट्रॅकवर

0
6
जत : कन्या हायस्कूल व श्री दत्त उच्च माध्यमिक विद्यालयाची माजी राष्ट्रीय खेळाडू राणी सदाशिव मुचंडी हिची जागतिक आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी चीन (चेंगडू ) येथे 28 जुलै ते 8 ऑगस्ट 2023.दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नुकत्याच कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी, भुवनेश्वर ओडीसा येथे झालेल्या, अखिल भारतीय युनिव्हर्सिटी स्पर्धेत, हाफ मॅरेथॉन (  21 किलोमीटर ) स्पर्धेत 1 तास 21 मिनिटे ही वेळ तिने नोंदवली.
राणी मुचंडी जतच्या कन्या हायस्कूल व श्री दत्त उच्च माध्यमिक विद्यालयात 2014 ते 2018 पर्यंत, राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक हाजीसाहेब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सराव करत होती.त्याचवेळी मध्य प्रदेश ( भिलाई ) येथे 15 जानेवारी 2018 रोजी झालेल्या राष्ट्रीय असोसिएशन क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभाग नोंदवला होता व 2 जानेवारी 2018 पुणे ( बालेवाडी ) येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय  क्रॉस कंट्री स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवला होता.
 2018 नंतर भारतीय खेल‌ प्राधिकरण चे प्रशिक्षक सिंग  सरांच्या कडे सातत्याने धावण्याचा सराव करीत होती. 2014 ते आजतागायत अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा जिद्द व चिकाटीच्या जोरावर, सातत्याने प्रयत्न करत  गाजविल्या व गोल्ड, सिल्वर व ब्रांच पदके मिळवली.
सध्या ती शिवाजी विद्यापीठ अंतर्गत कोरेगाव येथील डी पी भोसले महाविद्यालयात एम ए प्रथम वर्षात शिकत आहे.राणी अभ्यासात पण खूप हुशार आहे.तिला बारावीच्या बोर्ड परीक्षे मध्ये 80 टक्के मार्क मिळालेले आहेत. राणी खूप शांत व संयमी आहे.राणी मुचंडीच्या आंतरराष्ट्रीय निवडी बद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक अण्णासाहेब लोखंडे सर, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक सर व माणिक वाघमारे सर, तालुका क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा सह संचालक‌ अनिल चोरमुले सर व राज्याचे माजी संचालक नागेश मोटे सर‌. यांनी राणीचे अभिनंदन केले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here