डफळापूर बसस्थानकांसाठी निवेदन
डफळापूर : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांना डफळापूर बसस्थानक जिल्हा नियोजन मधून बांधून मिळावे याबाबत निवेदन देण्यात आले.
डफळापूर हे 25 गावाचा केंद्र बिंदू असलेल्या जत सांगली रस्त्यावरील डफळापूर येथे 1967 साली बसस्थानक बांधण्यात आले आहे. आतापर्यंत संबंधित अधिकारी यांनी देखभाल दुरुस्ती च्या नावाखाली मोठी रक्कम हडप केली आहे.गेल्या अनेक वर्षात कधीही या बस स्थानकाची एकदाही दुरुस्ती केली गेली नाही.
त्यामुळे दुर्लक्षित असलेल्या या बस स्थानकाचीहे पडझड झाली आहे संबधित अधिकाऱ्याच्या दुर्लक्ष पणामुळे बसस्थानक कोसळले आहे.सद्य स्थितीत प्रवाशांना गाडीची वाट पहात रस्त्याकडेला उभे रहावे लागते आहे,तरी प्रवाशांची गैरसोय होऊ नये.यासाठी आपल्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीतून तातडीने नवीन बसस्थानक बांधण्यात यावे असे निवेदन कॉ.हणमंत कोळी यांच्याकडून देण्यात आले.