डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील फाउंडेशनकडून रक्तदान शिबीराचे‌ आयोजन

0
जत : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील फाउंडेशन च्या माध्यमातून एक लाख रक्तदान करण्याचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबिर हे सांगली जिल्ह्यातील पलूस कडेगाव येथे सुरू आहे.पलूस व कडेगाव तालुके संपल्यावर जत तालुक्यामध्ये या शिबिराचे आयोजन चंद्रहार दादा पाटील फाउंडेशन च्या वतीने करण्यात येणार आहे.

 

चंद्रहार दादा पाटील हे आज जत तालुका दौऱ्यावर आले असता युवा सेनेचे सचिन मदने यांनी भेट घेतली.जत तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन कशा पद्धतीने केले पाहिजे व जत तालुक्यातून रक्तदान कशा पद्धतीने जास्तीत जास्त करता येईल, यावर विषयावर चर्चा करण्यात आली.

 

यावेळी पत्रकारांशी बोलताना सचिन मदने म्हणाले,चंद्रहार दादा पाटील फाउंडेशन हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे हे फाउंडेशन आहे.कोरोना पासुन रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे.याच धरतीवर चंद्रहार दादा पाटील यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून एक लाख रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला सांगली जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.आता कडेगाव पलूस येथे रक्तदान शिबिर सुरू आहे.

 

Rate Card
हे तालुके संपले की जत तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गट व जत शहरांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करणार असल्याची माहिती सचिन मदने यांनी दिली.तालुक्यातून जास्तीत जास्त रक्तदान करू असा विश्वास युवा सेना तालुकाप्रमुख सचिन मदने यांनी चंद्रहार दादा पाटील यांना दिला.यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख सचिन मदने वाषाणचे युवा नेते भाऊसाहेब पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.