संखमध्ये बकरी ईद उत्साहात संपन्न

0
संख : बकरी ईदनिमित्त संखसह परिसरातील गावात सामुहिक नमाज पठण करण्यात आले. ‘पाऊस पडूदे, शेतकऱ्यांवरील संकट टळू दे,’ अशी प्रार्थना करण्यात आली.संखमध्ये दरिबडची रोडवरील ईदगाह मैदानावर ईदुलअजहा तथा बकरी ईदची सामूहिक नमाज पठान करण्यात आली.

 

जतचे मौलाना आरिफ नदाफ यांनी भारतात सुख,शांतता व धार्मिक एकात्मता वाढावी,पाऊस पडावा अशी अल्लाहकडे प्रार्थना केली.नमाज पठणानंतर बकरी ईद साजरी करण्यात आली.गावातील मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.यावेळी उमदीचे सा.पो.नि.पंकज पवार,पो.कॉ.प्रशांत कोळी,होमगार्ड खोत उपस्थित होते.
संख येथील मुस्लिम समाज प्रमुख अब्बास सैय्यद,मैनूद्दीन जमादार,मलिकसाहेब मुल्ला,
हाजीमलंग शेख,हाफिज इलीयस जमादार,मुबारक सौदागर,हाजीलाल सौदागर, रफिक ममदापुर,
राजेभक्षर जमादार,यासिन मकानदार, चाँद मकानदार,रमजान शेख,राजू शेख,इलीयस शेख,अब्बास शेख,कमाल मुल्ला, मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.