डफळापूर : जिल्हा परिषद शाळा नंबर १ डफळापूरमध्ये सेवानिवृत्ती व निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.शाळेच्या मुख्याध्यापिका शाहीराबानू इनामदार यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल तर संजय राठोड यांचा बदली झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजमती देसाई,तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक मन्सूर खतीब,शिक्षणाधिकारी श्री.शेख साहेब,केंद्रप्रमुख रतन जगताप, लोकनियुक्त सरपंच सुभाष गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
आपल्या जीवनाचे यश कशात आहे हे प्रत्येकाने ठरवले पाहिजे.पैसा आणि व्यवहाराने श्रीमंत होणे म्हणजे यश नव्हे.दुसऱ्यांचे जीवन समृद्ध करताना आपलेही आयुष्य नितीमूल्याने जगा. कुटुंबव्यवस्था आणि नात्यांचे महत्त्व जाणा.जीवनाची कृतार्थता कशात आहे हे ओळखता आले पाहिजे,असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
स्कॉलरशिपमध्ये उत्तीर्ण झालेल्या पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा मन्सूर खतीब यांच्याकडून वही पेन्सिल देऊन सत्कार करण्यात आला.आभार लोंढे मॅडम यांनी मानले.यावेळी शंकर गायकवाड,विलास माने,प्रा.बि.आर.पाटील,सज्जनराव चव्हाण,पोपटराव पोकळे,अनिल शांत, संदीप चव्हाण,विकास वाघमारे,गणेश पाटोळे,साहेब आतार,आकाश महाजन, रोहित देसाई,अभिजीत पवार,विशाल छत्रे, बबन खोत,डॉ.देवयानी गावडे,उपसरपंच कांबळे,शबाना नदाफ,ग्रामपंचायत सदस्य पवार मॅडम,भारती हताळे,पालक,शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
स्वागत सागर महाजन, किशोर पाटील,अमोल पाटील,विशाल पाटोळे,शरद माळी यांनी केले.प्रस्तावना मुल्ला मॅडम,कोल्हे मॅडम,कोरे मॅडम यांनी केली.इनामदार मॅडम व राठोड सर यांनी सर्वांचे आभार मानले.शाळेचे शिक्षक देसाई मॅडम,मुल्ला मॅडम,कोल्हे, दराडे मॅडम,डोंगरे सर,उद्योग संकपाळ उपस्थित होते.
डफळापूर : जिल्हा परिषद शाळा १ चे मुख्याध्यापिका शाहीराबानू इनामदार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त व संजय राठोड यांचा बदली झाल्याबद्दल सहकुंटुब सत्कार करण्यात आला.