जत : तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी मिळणेसाठी महाराष्ट्र कर्नाटक दोन राज्यात पाणी करार होऊन जत तालुक्यातील पूर्व भागास तुबची बबलेश्वर पाणी योजनेचे पाणी मिळावे अशी मागणी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांची भेट घेऊन केली.
यावेळी आ.विक्रमसिंह सावंत यांनी कर्नाटक राज्याचे जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव राकेश सिंग आणि कर्नाटक राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचीही भेट घेऊन तुबची बबलेश्वर पाणी योजनेच्या पाणी प्रश्नावर सकारात्मक चर्चा केली असून माणुसकीच्या दृष्टिकोनातून जत तालुक्यास पाणी देण्याचे आश्वासन डी.के.शिवकुमार यांनी दिले आहे.