उमदी : चालू मान्सून हंगामातील पावसाची सर्वच नक्षत्रे कोरडी गेली आहेत.एकाही नक्षत्रकाळात पाऊस पडला नाही. खरिप हंगाम शंभर टक्के वाया गेला आहे. शेतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. जनावरांना चारा मिळणे मुश्किल झाले आहे. एकंदरीतच मान्सूनच्या सुरवातीच्या टप्यातच जत तालुक्यातील उमदी,उटगी,जाडरबोबलाद, संख,करजगी,गिरगाव,मुंचडी,दरि
पिण्यासाठी विकतचे पाणी : पावसाअभावी सर्वच जसस्रोत कोरडे आहेत. शेतीच्या पाण्याबरोबरच जनावरांना व गावात राहणाऱ्या नागरिकांना टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.चाऱ्यासाठी ऊसाचा वापर : परिसरातील गावांमध्ये चाऱ्याचे मोठे दुर्भिक्ष झाले आहे. शेतीला पाणी नसल्या कारणाने चारावर्गीय पिके घेता येत नाहीत. त्यामुळे दुभत्या जनावरांना म्हैसाळचे पाणी आलेल्या गावातील ऊसाचा वापर करावा लागत आहे. त्यासाठी त्यांना एका टणाला तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये मोजावे लागत आहेत.म्हैसाळचे पाणी मृगजळ : मोठा गाजावाजा झालेली म्हैसाळ पाणी योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरली आहे.चालु वर्षी पैशे भरलेल्या शेतकऱ्यांना देखील म्हैसाळचे पाणी मिळाले नाही. व सध्या पाण्याचे आवर्तन बंद झाले आहे.
या अशा सर्व कारणाने उमदी परिसरात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने इथला कष्टकरी, शेतकरी, सामान्य नागरिक हवालदील झाला आहे. या घटकांना धीर देण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्याची गरज आहे.जनता पावसाची वाट पहात आहे. तसेच शासकीय मदतीसाठी लोकप्रतिनिधीकडे मोठ्या आशेने बगत आहे.