कुंभारी येथे कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालयाला शिवाजी विद्यापीठाची मान्यता

0
4
प्राचार्या सूर्यवंशी यांचे प्रवेश घेण्याचे आवाहन
जत : जत येथील दि फ्रेंडस असोसिएशन जत संस्थेच्या  कुंभारी शाखेत कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाला  शिवाजी विद्यापीठाची मान्यता मिळाली आहे ही संस्था उच्च शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सतत कार्य करीत असते.त्यामुळे जत पश्चिम भागातील बहुसंख्य विद्यार्थ्याना महाविद्यालयीन शिक्षणाची सोय झाली आहे. तरी विद्यार्थ्यांनी आर्ट्स,कॉमर्स,सायन्स या पदवी शिक्षणाच्या प्रथम वर्षाच्या वर्गाला प्रवेश घ्यावा असे आवाहन संस्थेने केले आहे.

 

कुंभारी,डफळापूर,बेंळूखी,अंकले,बाज,डोरली,ढालगाव,चोरोची,नागज,हिवरे, धावडवाडी,प्रतापपूर,गुळवंची,बेवनूर, वाळेखिंडी,शेगाव,कोसारी,बागेवाडी, बिरनाळ या परिसरातील व भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना या महाविद्यालयाचा फायदा होणार आहे.

 

या महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, उच्च प्राध्यापक वर्ग, सुसज्ज व स्वतंत्र प्रयोगशाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, भव्य क्रिडागंण, NCC व NSS  या सोयींमुळे गरीब व गरजु विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे तरी विद्यार्थ्यांनी बीए, बी.कॉम , बीएससी च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या सूर्यवंशी एम एम यांनी केले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here